शिंगणापुरात शनी अमावस्येनिमित्त दोन लाख भाविकांचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 05:31 PM2019-09-28T17:31:04+5:302019-09-28T17:31:54+5:30
भाद्रपद अमावस्येनिमित्त शनिवारी सुमारे दोन लाख भाविकांनी शनी दर्शन घेतले. पहाटेपासूनच राज्यभरातून आलेल्या भाविकांनी रांगा लावल्या होत्या.
सोनई : भाद्रपद अमावस्येनिमित्त शनिवारी सुमारे दोन लाख भाविकांनी शनी दर्शन घेतले. पहाटेपासूनच राज्यभरातून आलेल्या भाविकांनी रांगा लावल्या होत्या.
शनिवारी पहाटे ३ वाजून ४६ मिनिटांनी अमावस्येस सुरुवात झाली. रात्री ११.५६ मिनिटांनी अमावस्या संपणार आहे. यामुळे संपूर्ण दिवस अमावस्या असल्यामुळे दिवसभर भाविक दर्शनसाठी येत होते. पहाटेची महाआरती औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, शनिभक्त राकेश कुमार (आॅस्टेलिया), सौरभ बोरा (मुंबई) हस्ते झाली. पहाटेपासून अमावस्या लागणार असल्यामुळे बाहेरील भाविक रात्रीच दाखल झाले होते.
सूर्यपुत्र शनिदेव महाराज की जय..पवनपुत्र हनुमान की जय... या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला होता. मंदिर परिसर आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंदिर परिसरातील रस्ते गर्दीने फुलले होते.