बनावट लग्न लावून दोन लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:14 AM2021-06-30T04:14:57+5:302021-06-30T04:14:57+5:30

याप्रकरणी नवरीची भूमिका निभावणारी दीपाली विजय बडोदे (रा. सासवड, पुणे), बापू शंकर दातीर (रा. श्रीगोंदा), कुंडलिक शाहू चव्हाण, अनिता ...

Two lakh gang for fake marriage | बनावट लग्न लावून दोन लाखांचा गंडा

बनावट लग्न लावून दोन लाखांचा गंडा

याप्रकरणी नवरीची भूमिका निभावणारी दीपाली विजय बडोदे (रा. सासवड, पुणे), बापू शंकर दातीर (रा. श्रीगोंदा), कुंडलिक शाहू चव्हाण, अनिता भगवान गिरे (रा. औरंगाबाद) यांच्यासह हडपसर येथील वैशाली नावाच्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपाली बडदे वगळता इतर आरोपी फरार आहेत.

याप्रकरणी फसवणूक झालेल्या पिंपरखेड येथील तरुणाने फिर्याद दिली आहे. त्या तरुणास १८ जून रोजी बापू दातीर याने फोन करून सांगितले की, पाहुणे मुलगी घेऊन आले आहेत तुम्ही श्रीगोंदा येथे या. त्यानंतर तरुण व त्याचे आई-वडील श्रीगोंदा येथे आले. यावेळी नियोजित नवरी म्हणून दीपाली समोर आली. मुलाला मुलगी पसंत पडली. यावेळी दातीर याने मुलीच्या वडिलांना देण्यासाठी मुलाच्या नातेवाईकांकडून दोन लाख रुपये घेतले. त्यानंतर १९ जून रोजी लग्न झाले. विवाहानंतर दोन दिवसांतच नव्या नवरीने नखरे दाखविण्यास सुरुवात केली. तेव्हा तिला विचारपूस केल्यानंतर तिने या बनावट लग्नाबाबत सांगितले. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी दीपाली हीस ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

------------------

Web Title: Two lakh gang for fake marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.