गट सचिवांना दोन लाखांचे विमाकवच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:22 AM2021-05-06T04:22:52+5:302021-05-06T04:22:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या सचिवांचा जिल्हा सहकारी बँक व शासनाची जिल्हास्तरीय समिती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या सचिवांचा जिल्हा सहकारी बँक व शासनाची जिल्हास्तरीय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य विमा उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटकाळात गट सचिवांना दोन लाखांपर्यंतचा विमा मिळणार आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांनी दिली.
गट सचिवांना इतर कोणत्याही शासकीय सुविधा नाहीत. त्यामुळे जिल्हा बँक व जिल्हास्तरीय समिती यांच्या सहभागातून प्रत्येक सचिवाचा आरोग्य विमा उतरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व विविध कार्यकारी सेवा सोसायटीतील सचिवांसाठी आरोग्य विमा लागू असणार आहे. या विम्याचा धनादेश बँकेने जिल्हास्तरीय समितीकडे सुपूर्द केला आहे. जिल्ह्यातील जवळपास ७५६ सचिवांना त्वरित लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले. याबाबत माहिती देताना जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर म्हणाले की, जिल्हास्तरीय समितीच्या खात्यातून विमा हप्त्याची रक्कम विमा कंपनीस धनादेशाव्दारे पाठविण्यात आल्याने हा विमा बुधवारपासून लागू झाला असल्याचे आहेर यांनी सांगितले.
.....
जिल्ह्यातील रुग्णालयांत मिळणार सुविधा
शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या रुग्णालयांत ही सुविधा उपलब्ध असणार आहे. सचिवांना यामुळे दोन लाखांपर्यंतचा विमा मिळणार असून, ही योजना सचिवांना तत्काळ लागू केली जाणार असल्याचे याविषयी माहिती देताना बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांनी सांगितले.