गुहा परिसरात दोन बिबट्याचा थरार : विद्यार्थी जखमी, शेतकऱ्यांकडून दगडांचा मारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 01:33 PM2019-03-05T13:33:33+5:302019-03-05T15:19:19+5:30

गुहा परिसरात असलेल्या कोळसे मळ्यात सोमवारी सायंकाळी ५ वाजता दोन बिबट्यांनी शेतकऱ्यांचा थरकाप उडविला़ मकाच्या शेतामध्ये २० ते २५ शेतकऱ्यांनी बिबट्याविरूध्द काठ्या व दगडाच्या सहाय्याने युध्द केले़

Two leopards in the cave area: students injured, stones hit by farmers | गुहा परिसरात दोन बिबट्याचा थरार : विद्यार्थी जखमी, शेतकऱ्यांकडून दगडांचा मारा

गुहा परिसरात दोन बिबट्याचा थरार : विद्यार्थी जखमी, शेतकऱ्यांकडून दगडांचा मारा

राहुरी : गुहा परिसरात असलेल्या कोळसे मळ्यात सोमवारी सायंकाळी ५ वाजता दोन बिबट्यांनी शेतकऱ्यांचा थरकाप उडविला़ मकाच्या शेतामध्ये २० ते २५ शेतकऱ्यांनी बिबट्याविरूध्द काठ्या व दगडाच्या सहाय्याने युध्द केले़ त्यानंतर वैतागलेल्या बिबट्याने धूम ठोकली. दरम्यान बिबट्याने केलेल्या हल्ल्यात अभिजीत कोळसे हा महाविद्यालयीन विद्यार्थी जखमी झाला़
कोळसे मळ्यातील मकाच्या शेतात बिबट्या असल्याची माहिती शेतात काम करणाºया कामिनी कोळसे यांनी दिली़ त्यानंतर अभिजित कोळसे या बीएस्सीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांने हातात कोयता घेत मकाच्या शेताकडे धाव घेतली़ अभिजितला पाहताच दोन बिबट्यांनी अभिजितच्या पाठीवर व हातावर नखांनी जखमा केल्या़ अभिजित जमिनीवर कोसळल्यानंतर उपस्थित महिलांनी आरडाओरड सुरू केली़
महिलांच्या आवाजामुळे परिसरात असलेले शेतकरी हातात दगड व काठ्या घेऊन मकाच्या दिशेने धावले़ मकाच्या शेतात पाऊण तास दोन बिबट्यांचा शेतकºयांनी पाठलाग केला़ बिबट्यानेही शेतकºयांना अनेकदा चकवा दिला़ अखेर स्वत:चा बचाव करण्यासाठी बिबट्यांनी धूम ठोकली़ बिबट्याला पिटाळून लावण्यासाठी नामदेव कोळसे, गणेश कोळसे, हरिभाऊ कोळसे, रवींद्र कोळसे, किरण कोळसे, अनिल कोळसे, एकनाथ कोळसे, पिनू उºहे, दत्तू कोळसे, बंडू कोळसे, प्रवीण कोळसे, कार्तिक कोळसे यांनी मदत केली.
जखमी अवस्थेत असलेल्या अभिजित कोळसे यास राहुरी फॅक्टरी येथील खाजगी रूग्णालयात प्रथमोपचारासाठी दाखल करण्यात आले़ त्यानंतर देवळाली प्रवरा येथील शासकीय रूग्णालयात लस देण्यात आली़ वनखात्याचे कर्मचारी घटनास्थळी आले़ वनखात्याने मात्र बिबट्या नसेल तरस असेल, उद्या पुन्हा येतो असे सांगून वेळ मारून नेली़ त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकºयांनी नाराजी व्यक्त करुन बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली.

मकाच्या शेतात दोन बिबटे असतानाही मंगळवारी दुपारपर्यंत वन खात्याचे कर्मचारी फिरक ले नाहीत़ गुहा परिसरात पिंजरा लावावा अशी आमची मागणी आहे़ आम्ही पिटाळून लावलेले दोन बिबटे होते. -किरण कोळसे, शेतकरी.

अभिजित याच्या बोटाला जखम झाल्यानंतर परीक्षेला जाऊ नको असा सल्ला आई-वडिलांनी दिला़ मात्र अभिजितने परवानगी घेऊन देवळाली प्रवरा कॉलेज गाठले़ बीएस्सी प्रथम वर्गात शिकणाºया अभिजितने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत मंगळवारी दुपारी २ वाजता फिजीक्स विषयाचा पेपर दिला़
 

Web Title: Two leopards in the cave area: students injured, stones hit by farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.