कोपरगाव तालुक्यात विद्युत तारेला चिटकून दोन अल्पवयीन मुलींचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 01:23 PM2020-05-25T13:23:34+5:302020-05-25T13:36:11+5:30
कोपरगाव तालुक्यातील जेऊरकुंभारी हद्दीत सुरू असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामावर उच्च दाबाच्या विद्युत वाहक तारेला दोन अल्पवयीन चिटकल्याने त्यांचा जागेवरच दुर्दैवी अंत झाल्याची घटना रविवारी (दि. २४ मे) रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.
कोपरगाव : तालुक्यातील जेऊरकुंभारी हद्दीत सुरू असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामावर उच्च दाबाच्या विद्युत वाहक तारेला दोन अल्पवयीन चिटकल्याने त्यांचा जागेवरच दुर्दैवी अंत झाल्याची घटना रविवारी (दि. २४ मे) रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, जेऊरकुंभारी येथील दोघी अल्पवयीन मुली गाडी शिकण्यासाठी समृद्धी महामार्गाच्या काम सुरू असलेल्या ठिकाणी आल्या होत्या. त्यांच्याबरोबर धनश्री गणेश पालवे (वय ८), बेट येथील प्रतीज्ञा नितीन आव्हाड (वय ७) या दोघी आल्या होत्या. खेळता खेळता त्या जवळच असलेल्या उच्च दाबाच्या विद्युत तारेला एकीचा स्पर्श झाला. तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणीने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला असता ती देखील विद्युत तारेला चिटकल्याने दोघींचा जागीच अंत झाला.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस आणि वीज वितरणचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. दोन्ही मुलींचे मृतदेह ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात पाठवले. दरम्यान समृद्धी महामार्गाच्या ठेकेदाराने सुरक्षा रक्षक तैनात करून खबरदारी घेतली असती तर ही घटना घडलीच नसती अस ग्रामस्थांनी म्हटले आहे. लवकरात लवकर याठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करून ठेकेदाराने खबरदारी घ्यावी अन्यथा काम बंद करण्याचा इशारा जेऊरकुंभारी ग्रामस्थांनी दिला आहे.