दोन महिन्यानंतर जामखेडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला; सास-याला भेटायला गेला होता मुंबईला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 01:01 PM2020-06-24T13:01:10+5:302020-06-24T13:01:55+5:30
मुंबईला सास-याला भेटायला गेलेल्या जामखेड तालुक्यातील एका युवकाचा बुधवारी (दि. २४ जून) कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे यांनी दिली.
जामखेड : मुंबईला सास-याला भेटायला गेलेल्या जामखेड तालुक्यातील एका युवकाचा बुधवारी (दि. २४ जून) कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे यांनी दिली.
जामखेड तालुक्यातील जवळका येथील युवक हा मुंबई येथे असलेला सास-याला सहा दिवसापूर्वी भेटायला गेला होता. तो रविवारी खर्डा येथे क्वारंटाईन होण्यासाठी आला होता. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे यांनी त्यास स्वॅब घेण्यासाठी अहमदनगर येथे पाठवले होते. त्याचा बुधवारी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोन महिन्यानंतर प्रथमच कोरोनाचा पुन्हा जामखेडमध्ये शिरकाव झाला आहे.
आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल बोराडे यांनी या युवकास डॉ. आरोळे हॉस्पिटल येथे क्वारंटाईनमध्ये घेऊन गेले. तेथे त्याची अधिक चौकशी केली. मुंबई येथे कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या सासºयाला भेटायला गेलो होतो, असे याने सांगितले. त्यामुळे सदर युवकाला त्यांनी तातडीने अहमदनगर येथे स्वॅब तपासणीसाठी रविवारी पाठवले होते.