रांजणगावात आणखी दोन गायी दगावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:20 AM2021-03-14T04:20:14+5:302021-03-14T04:20:14+5:30
कोपरगाव : तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे शुक्रवारी व शनिवारी या दोन दिवसात आणखी दोन गायींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ...
कोपरगाव : तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे शुक्रवारी व शनिवारी या दोन दिवसात आणखी दोन गायींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गावातील एकूण मृत जनावरांचा आकडा आता नऊवर गेल्याने गावातील पशुपालक भयभीत झाले आहेत. तर जनावरांच्या मृत्यूमुळे पशुपालकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. हा मृत्यू मूरघास खाऊ घातल्याने तर होत नाहीना अशी शंका स्थानिक पातळीवर ग्रामस्थांमधून वर्तविली जात आहे.
रांजणगाव देशमुखमध्ये बुधवारी व गुरुवारी या दोन दिवसात कैलास मुरलीधर गोर्डे या शेतकऱ्याच्या चार गायी दगावला होत्या. तर दशरथ साहेबराव खालकर, संपत खालकर यांची प्रत्येकी एक गाय तर अनिल खालकर यांचा एक बैल अशी एकूण सात जनावरे दगावली होती. येथील जनावरे दगावण्याचे सत्र अद्यापही सुरूच असल्याने कैलास गोर्डे यांची व दशरथ खालकर यांची गत दोन दिवसात प्रत्येकी एक गाय मृत झाली आहे. त्यामुळे एकट्या गोर्डे यांच्या तब्बल पाच तर खालकर यांच्या दोन गायी दगावल्या आहेत.
...
पशुपालक चिंतेत
रांजणगाव येथे पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांनी भेट दिली होती. मृत जनावरांचे चारा, खाद्य व रक्ताचे नमुने घेऊन तपासणीसाठी पुणे येथे पाठविले होते. त्याचा अहवाल आल्यानंतर जनावरांचा मृत्यू हा हिरवा चारा घातल्यानेच झाला असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यावर पशुपालकांनी जनावरांना हिरवा चारा देणे बंद केले, तरीही जनावरे दगावत आहे. त्यामुळे जनावरे दगावण्याचे नेमके कारण काय असू शकते यातच पशुपालक पुरते चक्रावून गेले आहे.