ब्राम्हणी पाणीपुरवठा योजनेत आणखी दोन गावांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:15 AM2021-01-01T04:15:20+5:302021-01-01T04:15:20+5:30
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत ब्राह्मणी व इतर चार गावे प्रादेशिक पाणीयोजनेस २४ जून २०१९ रोजी प्रशासकीय मंजुरी मिळाली. परंतु, ...
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत ब्राह्मणी व इतर चार गावे प्रादेशिक पाणीयोजनेस २४ जून २०१९ रोजी प्रशासकीय मंजुरी मिळाली. परंतु, आचारसंहिता लागू झाल्याने कामाची निविदा प्रक्रिया राबविता आली नाही.
योजनेची आखणी दरडोई ४० लिटरप्रमाणे केली होती. नोव्हेंबर २०१९ अखेर जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत योजनांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, ३० जानेवारी २०२० च्या शासन परिपत्रकाप्रमाणे ५५ लिटर दरडोई निकषांप्रमाणे योजना संकल्पित करून फेरमान्यता घेण्याविषयी सूचना प्राप्त झाल्या. योजनेत ब्राह्मणी, उंबरे, पिंप्री अवघड, सडे, कुक्कडवेढे या गावांचा समावेश होता. चेडगाव व मोकळ ओहळ या दोन गावांचा समावेश करून, योजनेचा प्रकल्प अहवाल सात गावांसाठी तयार करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार योजनेचा प्रकल्प अहवाल जीवन प्राधिकरणाच्या नगर कार्यालयातून मुख्य अभियंता, नाशिक यांच्या कार्यालयात मंजुरीसाठी सादर केला असल्याचे सराफ यांनी सांगितले. नवीन योजनेसाठी ६० कोटी ५७ लाख रुपये ढोबळ किमतीचे अंदाजपत्रक व आराखडे तयार केले आहेत.
........
ब्राह्मणी व इतर चार गावे योजनेच्या जुन्या आराखड्यात मुळा धरणातून १० किलोमीटरची मुख्य जलवाहिनी एसडीपी प्रकारची होती. ती वारंवार फुटण्याचा धोका होता. नवीन योजनेत मुख्य जलवाहिनी लोखंडी केली जाणार आहे. ४० ऐवजी ५५ लिटर दरडोई पाणी मिळेल.
- डॉ. राजेंद्र बानकर, माजी उपसरपंच, ब्राह्मणी