रुग्णांच्या सेवेसाठी महापालिकेच्या दोन रुग्णावाहिका आजपासून धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 12:25 IST2020-07-14T12:25:19+5:302020-07-14T12:25:49+5:30
अहमदनगर : शहरामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता कोणत्याही सामान्य माणसाला तो पॉझिटिव्ह आढळल्यानंतर किंवा कोरोनाच्या लक्षणामुळे तातडीची उपचार सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिकेने दोन मोफत रुग्णवाहिकाांची सेवा सुरू केली आहे. या दोन रु्गणवाहिका आजपासून शहरवासियांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत.

रुग्णांच्या सेवेसाठी महापालिकेच्या दोन रुग्णावाहिका आजपासून धावणार
अहमदनगर : शहरामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता कोणत्याही सामान्य माणसाला तो पॉझिटिव्ह आढळल्यानंतर किंवा कोरोनाच्या लक्षणामुळे तातडीची उपचार सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिकेने दोन मोफत रुग्णवाहिकाांची सेवा सुरू केली आहे. या दोन रु्गणवाहिका आजपासून शहरवासियांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत.
अहमदनगर शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेकांना वेळेवर सुविधा मिळत नाहीत. तसेच रुग्णवाहिका उपलब्ध नसेल तर तातडीचे उपचार मिळण्यापासून सामान्य नागरिक वंचित राहतो. एखादा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळला, त्याला कोरोनाच्या लक्षणांमुळे त्रास होत असेल तर त्याला उपचारासाठी लवकरात लवकर दवाखान्यात नेता यावे, यासाठी महापालिकेने दोन रुग्णवाहिका सेवेत उपलब्ध केल्या आहेत. या सेवेचे आज सकाळी महापालिका मुख्यालयात प्रारंभ झाला. यावेळी महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.