घरफोड्या करणा-या  दोघा परप्रांतीयांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 06:37 PM2018-09-22T18:37:31+5:302018-09-22T18:37:34+5:30

अहमदनगर : नगर शहरासह परिसरात घरफोड्या करणाºया उत्तरप्रदेश येथील दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी अटक केली़ उत्तरप्रदेश ...

Two parasites arrested for burglary | घरफोड्या करणा-या  दोघा परप्रांतीयांना अटक

घरफोड्या करणा-या  दोघा परप्रांतीयांना अटक

अहमदनगर: नगर शहरासह परिसरात घरफोड्या करणाºया उत्तरप्रदेश येथील दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी अटक केली़ उत्तरप्रदेश राज्यातील प्रतापगढ परिसरातून या दोघांना अटक करण्यात आली.
दारासिंग रतितराम सिंग (वय १९) व धिरजसिंग श्रीचंद्रशबहादूर सिंग (वय ३०) असे ताब्यात घेतलेल्या दोघांची नाव आहेत़ या चोरट्यांनी त्यांच्या तीन साथीदारांसह १३ सप्टेंबर २०१७ रोजी शहरातील बालिकाश्रम रोड, कृष्ठधाम रोड व पाईपलाईन रोड परिसरात घरफोडी करून ३ लाख ३४ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता़ या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू होता़ स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरिक्षक ज्ञानेश्वर फडतरे, कॉस्टेबल मन्सूर सय्यद, मनोहर गोसावी, संतोष लोढे,विशाल दळवी, रविंद्र कर्डिले, रवीकिरण सोनटक्के, दीपक शिंदे, विजय ठोंबरे, सचिन अडबल, राहुल सोळुंके, मेघराज कोल्हे यांनी आरोपींना ताब्यात घेतले़ अटक केलेल्या दोघांसह बिरेनसिंग रामकेवलसिंग ठाकूर, टोनू उर्फ निरजसिंग श्रीचंद्रेश्बहाूदर सिंग व छोटू उर्फ सुरजसिंग श्रीचंद्रेशबहादूर यांची टोळी एकत्र मिळून घरफोड्या करतात़ यातील ठाकूर व टोनू सिंग हे सध्या नागपूर जेलमध्ये आहेत़ या चोरट्यांना पुढील कारवाईसाठी तोफखाना पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे़

वाहनाचा क्रमांक बदलून जिल्ह्यात प्रवेश
दारासिंग व त्याची टोळी कारचा वापर करत होते़ ज्या जिल्ह्यात चोरीसाठी जायचे त्या जिल्ह्यातील आरटीओचा क्रमांक कारवर टाकत होते़ त्यामुळे त्यांच्यावर कुणी संशय घेत नव्हते़ कारआणि सुटाबुटात एखाद्या अपार्टमेंटमध्ये प्रवेश करत होते़ ज्या फ्लॅटला कुलूप आहे़ असा फ्लॅट हेरून कुलूप तोडून काही मिनिटातच ते घर साफ करून पसार होत होते़

 

 

Web Title: Two parasites arrested for burglary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.