नदीत पाय घसरून पडल्याने कोपरगाव तालुक्यातील दोघांचा बुडून मृत्यू

By सुदाम देशमुख | Published: November 2, 2024 02:42 PM2024-11-02T14:42:52+5:302024-11-02T14:43:06+5:30

नदीवर गाडी धुवत असताना पाय घसरुन नदीत पडल्याने दोन  शेतकऱ्यांचा बुडून मृत्यू झाला.

Two people drowned in Kopargaon taluka after falling in the river | नदीत पाय घसरून पडल्याने कोपरगाव तालुक्यातील दोघांचा बुडून मृत्यू

नदीत पाय घसरून पडल्याने कोपरगाव तालुक्यातील दोघांचा बुडून मृत्यू

चांदीकासारे (जिल्हा अहिल्यानगर):  एकीकडे सर्वजण दिवाळीचा आनंद साजरा करीत असताना कोपरगाव तालुक्यातील मढी बुद्रुक मध्ये  उम्रावती नदीवर गाडी धुवत असताना पाय घसरुन नदीत पडल्याने दोन  शेतकऱ्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज, शनिवारी दुपारी घडली. उत्तम राहणे (वय ४२), व माधव गमे (वय ३२) असे मृत शेतकऱ्यांची नावे आहेत.

सध्या सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरु असून सर्वच कुटुंबात आनंदाचा क्षण आहे. परंतु याच आनंदावर विर्जन पडल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील मढी येथे घडली आहे. मढी येथील उम्रावती नदीवर आपले चारचाकी वाहन धुण्यासाठी गेले असता उत्तम राहणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. राहणे हे आपले वाहन धुत असताना पाय सरकून नदीत पडले. त्याच वेळी माधव गमे हे देखील त्यांना वाचवण्यासाठी गेले. दोघांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बेपत्ता झाले. ही माहिती पंचक्रोशीत पसरल्यानंतर कोपरगाव नगर परिषदेच्या पथकाने शोध घेतला. त्यावेळी मृतदेह सापडण्यास यश आले आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी राहणे आणि गमे कुटुंबीयांवर दु: खाचा डोंगर कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Two people drowned in Kopargaon taluka after falling in the river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.