नाशिक-पुणे महामार्गावर कंटेनरच्या धडकेत दोन जण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 11:50 AM2018-02-19T11:50:19+5:302018-02-19T11:51:17+5:30
कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले. ही घटना पुणे-नाशिक महामार्गावरील एकोणीस मैल शिवारातील बिकानेर ढाब्याच्या समोर रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली.
संगमनेर : कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले. ही घटना पुणे-नाशिक महामार्गावरील एकोणीस मैल शिवारातील बिकानेर ढाब्याच्या समोर रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली.
संतोष बबन सातपुते व संतोष मधुकर खरे (दोघेही रा. संगमनेर) अशी मृतांची नावे आहेत. नाशिकहून पुणेकडे जाणा-या कंटेनरने (आर. जे. ०१, जी. बी. ६३५१) खरे व सातपुते हे प्रवास करित असलेल्या दुचाकीला ( एम. एच. १७, जे. ४७७७) धडक दिली. यात सातपुते व खरे हे दोघे जागीच ठार झाले. या प्रकरणी घारगाव पोलिस ठाण्यात कुठल्याही गुन्ह्याची नोंद झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.