राशीनचे दोन गुन्हेगार पाच जिल्ह्यांतून तडीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:16 AM2021-05-31T04:16:50+5:302021-05-31T04:16:50+5:30
राशीन (अहमदनगर) : गंभीर स्वरूपाचे वेगवेगळे गुन्हे दाखल असलेले राशीन (ता. कर्जत) येथील दोन गुन्हेगारांना पाेलिसांनी एक वर्षासाठी पाच ...
राशीन (अहमदनगर) : गंभीर स्वरूपाचे वेगवेगळे गुन्हे दाखल असलेले राशीन (ता. कर्जत) येथील दोन गुन्हेगारांना पाेलिसांनी एक वर्षासाठी पाच जिल्ह्यांतून तडीपार केले आहे.
नगर जिल्ह्यासह सोलापूर, बीड, औरंगाबाद, पुणे या पाच जिल्ह्यांतून त्यांना तडीपार केल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली. राम जिजाबा साळवे (वय २६), सागर नवनाथ साळवे (वय २४, दोघेही रा. राशीन, ता. कर्जत) अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्या दोघांविरोधात जमाव जमवून मारामारी करणे, दरोडा यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. ते अशा प्रकारचे वारंवार गुन्हे करत आहेत. त्यामुळे कर्जत पोलिसांनी त्या दोघांना पाच जिल्ह्यांतून तडीपार करावे, असा प्रस्ताव पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्फत प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्याकडे पाठविला होता.
या प्रस्तावाची चौकशी करून नष्टे यांनी त्या दोघांना अहमदनगर, बीड, पुणे, सोलापूर, औरंगाबाद अशा पाच जिल्ह्यांतून एक वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस प्रशासनाने त्या दोघांनाही तडीपारीची नोटीस बजावली.