नगर तालुक्यातील केकताई मठात दोन साधू जळालेल्या अवस्थेत आढळले
By Admin | Published: July 13, 2017 03:27 PM2017-07-13T15:27:03+5:302017-07-13T15:27:03+5:30
नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता जवळील केकताई मठात दोन साधू जळालेल्या अवस्थेत आढळून आले आहेत.
लोकमत आॅनलाइन
अहमदनगर : नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता जवळील केकताई मठात दोन साधू जळालेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. सद्यस्थितीत एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु केला आहे. ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.
नगर शहरापासून जवळच असलेल्या वडगाव गुप्ता परिसरात केकताईच्या जंगलात हा मठ आहे. या मठात सुदाम नामदेव बांगर(वय-५५ रा. वडगाव गुप्ता) व बाबासाहेब बाबुराव कराळे (वय-४५ रा.शेंडी) या दोघांचे मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आले. मठात सातत्याने साधूंचा वावर असून या साधूंकडे भक्त येत असल्याचे समजते. गुरुवारी सकाळी काही भक्त मठात आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. मठात तीन साधू असल्याचे सांगितले जाते त्यामुळे त्यादृष्टीने पोलिसांचा तपास करत आहेत.