खर्डा येथे दोन दुकानांना आग; दोन लाख रुपयांचे साहित्य खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 03:15 PM2020-01-15T15:15:40+5:302020-01-15T15:17:23+5:30
खर्डा येथील दोन दुकानांना मंगळवारी (१४ जानेवारी) पहाटे सहा वाजण्याच्या दरम्यान आग लागून लाखो रुपयांचे दुकानातील साहित्य भस्मसात झाले.
खर्डा : येथील दोन दुकानांना मंगळवारी (१४ जानेवारी) पहाटे सहा वाजण्याच्या दरम्यान आग लागून लाखो रुपयांचे दुकानातील साहित्य भस्मसात झाले.
खर्डा येथील कमिटी चौक (जुनी ग्रामपंचायत) येथे अंगद शिवाजी गोलेकर यांचे स्टेशनरी दुकान आहे. या दुकानास मंगळवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. यात एक लाख वीस हजार रुपयाचे नुकसान झाले. तर शेजारील गणेश किसन सूळ यांचे जयभवानी चायनीज हॉटेल यास आग लागून २७ हजार रुपयाचे नुकसान झाले. याबाबत खर्डा येथील तलाठी विकास मराळे यांनी पंचनामा केला आहे. अंगद शिवाजी गोलेकर यांच्या स्टेशनरी दुकानातील शालेय साहित्य, खेळण्या, पतंजलीच्या वस्तू खाक झाल्या. त्यांचे नुकसान एक लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. तर गणेश किसन सूळ यांच्या जय भवानी चायनीज हॉटेल दुकानात आग लागून आगीमध्ये त्यांच्या हॉटेलचे टेबल, खुर्च्या, मिक्सर, तांदूळ, नूडल्स, इन्वर्टर व इतर वस्तू जळाल्या. पंचनामामध्ये अंदाजे ७५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही.