मढेवडगावात एकाच रात्री फोडली दोन दुकाने; साडेतीन लाखाचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 05:07 PM2020-02-23T17:07:33+5:302020-02-23T17:08:09+5:30
मढेवडगाव येथील सुभाष शिंदे यांच्या शॉपीग सेंटरमधील अनुजा कापड व महादेव किराणा दुकानांचा मागील बाजूने पत्रा उचकटून चोरट्यांनी सुमारे साडेतीन लाख किमंतीचे कापड किराणा व रोकड लंपास केली.
श्रीगोंदा : मढेवडगाव येथील सुभाष शिंदे यांच्या शॉपीग सेंटरमधील अनुजा कापड व महादेव किराणा दुकानांचा मागील बाजूने पत्रा उचकटून चोरट्यांनी सुमारे साडेतीन लाख किमंतीचे कापड किराणा व रोकड लंपास केली. ही घटना शनिवारी (दि.२२ फेब्रुवारी) मध्यरात्री घडली.
घटनास्थळास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस हेड कॉन्स्टेबल भानुदास नवले यांनी तातडीने भेट श्वानपथकाने नगर-दौड रोडपर्यत माग काढला. दत्तात्रय शितोळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कापड दुकानातील २ लाख २४ हजार किमंतीचे कपडे व किराणा दुकानातील ५० हजार हजाराची रोकड व ३९ हजार किमंतीचा किराणा माल लंपास केला आहे.
चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूने पत्रा उचकटून आत प्रवेश केला. सुरुवातीला सीसीटीव्ही कॅमेरे फोडून टाकले. नंतर कापड दुकानातील सीडी बाहेर काढली. सीडीच्या साह्याने कपडे किराणा माल बाहेर काढला आणि चार चाकी गाडीत भरून चोरटे फरार झाले. श्रीगोंदा पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून पोलीस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत.