नियमचा भंग केल्याने राहुरी फॅक्टरीवरील दोन दुकाने सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 04:50 PM2020-05-24T16:50:00+5:302020-05-24T16:50:52+5:30
राहुरी फॅक्टरी येथील गौरव कलेक्शन या कापड दुकानात खरेदी करताना पंचवीस ते तीस नागरिक एकत्र आढळून आल्याने दुकान मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पायल कलेक्शन हे कापड दुकान आठ दिवसांकरिता सील करण्यात आले.
राहुरी : राहुरी फॅक्टरी येथील गौरव कलेक्शन या कापड दुकानात खरेदी करताना पंचवीस ते तीस नागरिक एकत्र आढळून आल्याने दुकान मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पायल कलेक्शन हे कापड दुकान आठ दिवसांकरिता सील करण्यात आले.
देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीतील राहुरी कारखाना येथील गौरव कलेक्शनमध्ये शुक्रवारी दुपारी खरेदी करण्यासाठी एकच वेळेस २५ ते ३० ग्राहकांना प्रवेश देण्यात आला. नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी सुदर्शन जळक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी सकाळी उपजिल्हाधिकारी आमिषा मित्तल यांना पायल कलेक्शनमध्ये गर्दी दिसल्याने दुकान बंद करण्यास सांगितले. मुख्याधिकारी अजित निकत यांना कळविले निकत यांनी आठ दिवसांसाठी पायल कलेक्शन सील केले आहे. कोरोना संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली आहे.