बारावीच्या परीक्षेवरून दोन शिक्षकांना मारहाण, तीन जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 05:28 PM2019-03-14T17:28:25+5:302019-03-14T17:29:11+5:30
नेवासाफाटा येथील त्रिमूर्ती शिक्षण संस्थेतील शिक्षकाने बारावीच्या परीक्षा चालू असताना आवारात थांबू नको
नेवासा : नेवासाफाटा येथील त्रिमूर्ती शिक्षण संस्थेतील शिक्षकाने बारावीच्या परीक्षा चालू असताना आवारात थांबू नको, असे एकास सांगितल्याचा राग मनात धरून दोन शिक्षकांना मोटारसायकलवर अडवून शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. नेवासा पोलिसांनी आठ ते दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अशोक नंदू पानकडे (वय २७ रा. मुकिंदपूर ता. नेवासा) या शिक्षकाने फिर्याद दिली आहे. मुकिंदपूर शिवारातील आसाराम महानोर यांच्या वस्तीजवळ शाळेचा विद्यार्थी आजारी असल्याने त्यास काल (दि.१३) रोजी मोटारसायकलवरून आणखी शिक्षक संदीप वाघमारे यांच्यासह दवाखान्यात घेऊन जात होते. त्यावेळी ६ मार्चच्या शाळेत बारावीचा पेपर चालू असताना अमोल बानकर याला शाळेच्या आवारात फिरु नको असे म्हटले होते. त्याचा राग त्याच्या मनात खदखदत होता. त्यावेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या अमोल राजेंद्र बानकर, प्रवीण भाऊसाहेब कोळेकर, सादीक पठाण, (पूर्ण नाव माहीत नाही) सर्व (रा. खडका ता. नेवासा) तसेच दिगंबर फुलसौंदर (रा. देवगडफाटा ता. नेवासा), गणेश पारखे व त्याचा भाऊ (नाव माहित नाही) रा. प्रवरासंगम तसेच इतर अन्य ८ साथीदार या सर्वांनी मोटारसायकल अडवून अमोल राजेंद्र बानकर, सादिक पठाण अशा दोघांनी मला व शिक्षक संदीप वाघमारे यांना लाकडी दांडक्याने मारहाण, शिवीगाळ केली. प्रवीण कोळेकर याने त्याच्या हातातील तलवार उगारली व जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी अमोल बानकर, गणेश पारखे, सादिकपठाण या तिघांना अटक केली असून पोलीस नाईक संतोष फलके करत आहेत.