ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लागणार दोन हजार मतदानयंत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 09:09 PM2017-09-25T21:09:17+5:302017-09-25T21:10:09+5:30

येत्या ७ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यातील होणाºया २०५ ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी निवडणूक शाखेने सुरू केली आहे.

Two thousand polling stations for the Gram Panchayat elections | ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लागणार दोन हजार मतदानयंत्रे

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लागणार दोन हजार मतदानयंत्रे

लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : येत्या ७ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यातील होणाºया २०५ ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी निवडणूक शाखेने सुरू केली आहे. या निवडणुकीसाठी सुमारे दोन हजार मतदानयंत्रांची गरज असून, ते मालेगावहून आणण्यासाठी निवडणूक शाखेचे पथक उद्या सकाळी रवाना होत आहे.
जिल्ह्यातील २०५ ग्रामपंचायतींची निवडणूक ७ आॅक्टोबर रोजी होत आहे. यात २०५ गावांतून सदस्यांच्या १९४० जागांसाठी ६३८३ अर्ज आले आहेत. तर सरपंचपदाच्या २०५ जागांसाठी १३८० जणांनी अर्ज भरले. मोठ्या प्रमाणावर दाखल झालेली अर्जांची संख्या लक्षात घेता जिल्ह्यात दोन हजार मतदानयंत्रे वापरावे लागण्याची शक्यता आहे. निवडणूक शाखेकडे १५० मतदानयंत्रे आहेत. अजून १७३२ यंत्रांची गरज असून, ते मालेगाव येथून मागविण्यात येत आहेत. ते आणण्यासाठी संजय गांधी योजनेचे तहसीलदार सदाशिव शेलार, नायब तहसीलदार सुनील पाखरे, अव्वल कारकून केदारी, देवतरसे आदींचे पथक पोलीस बंदोबस्तात मंगळवारी सकाळी मालेगावकडे रवाना होणार आहे. मंगळवारी संध्याकाळी ही मतदानयंत्रे नगरमध्ये येतील. त्यानंतर त्यांची प्राथमिक तपासणी, चाचणी घेतली जाईल. त्यानंतर तालुकानिहाय यंत्रांचे वाटप होईल. तेथे यंत्रांवर उमेदवारनिहाय मतपत्रिका लावण्याचे काम होईल. मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे ६ आॅक्टोबरला संबंधित ग्रामपंचायतींच्या मतदान केंद्रांवर ही यंत्रे रवाना होतील, अशी माहिती सामान्य प्रशासनचे तहसीलदार गणेश मरकड यांनी दिली.

२०५ गावांत सार्वजनिक सुट्टी
मतदान होणा-या २०५ गावांत मतदानाच्या दिवशी म्हणजे ७ आॅक्टोबर रोजी प्रशासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या गावांतील लोकांना मतदान करता यावे, यासाठी ही सुटी असेल.

Web Title: Two thousand polling stations for the Gram Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.