दोन टन गारगोटी जप्त : श्रीगोंदा पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 06:51 PM2019-03-02T18:51:18+5:302019-03-02T18:51:22+5:30
श्रीगोंदा पोलिसानी गारगोटीची तस्करी करणा-या एका जणाला ताब्यात घेतले. पिकअपमधील दोन टन गारगोटी जप्त करण्यात आली असून चालक नदीम सय्यद (रा. अंबड, जि.जालना) याला पोलिसांनी ताब्यात घेतले
श्रीगोंदा : श्रीगोंदा पोलिसानी गारगोटीची तस्करी करणा-या एका जणाला ताब्यात घेतले. पिकअपमधील दोन टन गारगोटी जप्त करण्यात आली असून चालक नदीम सय्यद (रा. अंबड, जि.जालना) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. कारवाईत ५ लाख ५३ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जलालपूर भागातून गारगोटीची तस्करी करणारा एक पिकअप श्रीगोंदा शहरातून जाणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांना मिळाली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील, पोलिस कर्मचारी अमोल आजबे, संदीप पितले, संतोष धांडे, किसनराव औटी यांच्या पथकाने शनिवारी पहाटे चारच्या दरम्यान मांडवगण रस्त्यावर सापळा लावला. त्याचदरम्यान एक पिकअप ( एम. एच.२१, एक्स- ८१७९) हा पिकअप तिथून वेगात निघून गेला.
पोलिस पथकाने या पिकअपचा पाठलाग करून अवधूतनगर परिसरात हा पिकअप रोखला. पोलिस कर्मचारी अमोल आजबे यानी पिकअपची अधिक पाहणी केली असता गाडीमध्ये हिरव्या रंगाचे दगड आढळून आले. पोलिसांनी पन्नास हजार रुपये किमतीची दोन टन गारगोटी, पिकअप असा ५ लाख ५३ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलिस कर्मचारी संदीप पितळे करत आहेत.