नशेत तर्रर्र शिक्षकाने श्रीगोंद्यात ठोकरल्या दोन गाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 06:19 PM2017-11-06T18:19:11+5:302017-11-06T18:21:58+5:30
या दोन्ही अपघातात स्विफ्ट आणि ओमिनी या दोन गाड्यांचे नुकसान झाले. स्विफ्ट आणि ओमिनी गाड्यांचे नुकसान झाल्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. मात्र मद्यपि शिक्षकाने लगेच त्यांना गाडीची नुकसान भरपाई देऊन टाकली.
श्रीगोंदा : पेडगाव येथील माध्यमिक विद्यालयातील एका मद्यपि शिक्षकाने नशेत तर्रर्र होऊन सोमवारी दुपारी तहसील कार्यालयाच्या आवारातील दोन गाड्या ठोकरल्या. यात कोणालाही इजा झाली नाही. मात्र, एका स्वीफ्ट कारचे व दुस-या ओमिनी गाडीचे नुकसान झाले.
पेडगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवर संबंधित शिक्षक सेवा करीत आहे़ सोमवारी दुपारी हा शिक्षक ओमिनी कारमधून तहसील कार्यालयाच्या आवारात आला. मात्र, तेथे वाहनांची गर्दी असल्यामुळे त्याला ओमिनी तहसील जवळील गेटमधून बाहेर काढता येईना. तो गाडी मागे-पुढे घेऊ लागला. त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्याची गाडी बापू गायकवाड (रा. वांगदरी) यांच्या गाडीवर मागून धडकली. गाडी धडकल्याचे त्यांच्या लक्षात येताच संबंधित शिक्षकाने जोरदार रेस करीत तेथून गाडी काढण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा एक अपघात झाला. यावेळी या मद्यपि शिक्षकाची ओमिनी समोरून येणा-या ओमिनी गाडीला धडक दिली. त्यानंतर नागरिकांनी गाडी कशीबशी थांबवून गाडी बंद केली. या दोन्ही अपघातात कोणालाही जखम झाली नाही. परंतु स्विफ्ट आणि ओमिनी या दोन गाड्यांचे नुकसान झाले. मात्र धडक देणा-या मद्यपि चालकाच्या ओमिनी गाडीला काहीच झाले नाही़ स्विफ्ट आणि ओमिनी गाड्यांचे नुकसान झाल्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. मात्र मद्यपि शिक्षकाने दोन्ही गाड्यांची लगेच नुकसान भरपाई देतो, असे सांगितले. लगेच त्यांना त्या शिक्षकाने त्याची गाडीची नुकसान भरपाई देऊन टाकली. त्यानंतर त्याच्या मित्रांनी या मद्यपि शिक्षकाला घरी नेऊन सोडले.