कोल्हापूर येथून नाशिकला विक्रीसाठी चालविलेला दोन ट्रक गुटखा पकडला
By अण्णा नवथर | Published: January 13, 2024 12:56 PM2024-01-13T12:56:01+5:302024-01-13T12:56:58+5:30
अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोलापूर महामार्गावर पकडला ही कारवाई पोलिसांनी शनिवारी पहाटेच्या वेळी केली.
अण्णा नवथर, लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनर: कोल्हापूर येथून मिरजगाव अहमदनगर मार्गे नाशिकला विक्रीसाठी चालविलेला दोन ट्रक गुटखा अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोलापूर महामार्गावर पकडला ही कारवाई पोलिसांनी शनिवारी पहाटेच्या वेळी केली.
सईद ऊर्फ रिजवान अर्शद दिवाण (वय ३७, रा. रविवार पेठ, कराड, जिल्हा सातारा), इसरार अहमद सलाउद्दीन शेख (वय २८, रा. इसकपुर, ता. माटीगंज, जिल्हा आझमगड, राज्य उत्तर प्रदेश) , जुबेर सिंकदर डांगे (वय २८, रा. कोले, ता. कराड, जिल्हा सातारा ), साजीद ऊर्फ शाहरुख अर्शद दिवाण( वय ३७, रा. रविवार पेठ, मोमीन मोहल्ला, ता. कराड, जिल्हा सातारा ) असे अटक केलेल्याची नावे आहेत.
कोल्हापूर येथून दोन ट्रक गुटखा सोलापूर, मिरजगाव अहमदनगर मार्गे नाशिकला जात होती. ही वाहने पथकाने ताब्यात घेतली असून, एकूण २८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, कर्नाटक राज्यातील महंमद सोहेल निपाणीकर व नदीम गुलखान पठाण यांनी कोल्हापूर येथून दोन ट्रक राज्यात बंदी असलेला पानमसालागुटखा नाशिक येथे विक्रीसाठी पाठविलेला होता. या ट्रक सोबत एक कारही होती. यातील कारचालक व त्याचे साथीदार ट्रक चालकांना वेळोवेळी फोनवरून माहिती देत होते. दोन ट्रक भरून गुटखा नगर मार्गे नाशिकला जात असल्याची माहिती मिळताच अहमदनगर स्थानिक पुणे शाखेच्या पथकाने नगर सोलापूर रोडवर सापळा रचला. त्यात वरील वाहने अलगद अडकली. ही कारवाई पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव आदींच्या पथकाने केली.