जामखेडमध्ये भंगारमधील दुचाकी गाड्यांना आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 04:56 PM2018-03-13T16:56:59+5:302018-03-13T16:59:44+5:30
तहसील कार्यालयाच्या मागे विविध गुन्ह्यातील जप्त केलेल्या पाच ते सहा मोटरसायकलींना मंगळवारी अचानक आग लागून खाक झाल्या. जामखेड नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाने तातडीने आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. यापूर्वी दोन वर्षापूर्वी देखील येथील १७ गाड्यांना आग लागली होती.
ठळक मुद्देपोलीस स्टेशनमधील वाहने सात-बारा नोंदीची रेकॉर्ड रुम वाचली
ल कमत न्यूज नेटवर्कजामखेड : तहसील कार्यालयाच्या मागे विविध गुन्ह्यातील जप्त केलेल्या पाच ते सहा मोटरसायकलींना मंगळवारी अचानक आग लागून खाक झाल्या. जामखेड नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाने तातडीने आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. यापूर्वी दोन वर्षापूर्वी देखील येथील १७ गाड्यांना आग लागली होती. जामखेड तहसिल कार्यालय व जामखेड पोलीस स्टेशन हे एकाच आवारात होते. यामुळे अनेक वर्षांपासून विविध गुन्ह्यासंबंधी जवळपास पन्नास ते साठ दुचाकी गाड्या या अवारातील तहसील कार्यालयाच्या पाठीमागे जामखेड पोलिसांनी ठेवलेल्या होत्या. त्यापैकी काही गाड्या नवीन पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आल्या तर काही दोन चाकी गाड्या अनेक वर्षांपासून जुने तहसील कार्यालयात पडून आहेत. त्यांच्यावर गंज चढून त्या खराब झाल्या आहेत. आता तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन जवळच काही अंतरावर नवीन जागेत स्थलांतर झाले आहे. त्यामुळे याकडे तहसील व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. १२ मार्च रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तहसील कार्यालयाच्या पाठीमागे अचानक धूर निघत असल्याचे निलेश शिंदे, दत्ता घुमरे या युवकांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी प्रभारी तहसीलदार विजय भंडारी यांना सदर माहिती दिली. भंडारी यांनी तातडीने जामखेड नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाला माहिती दिली. बंब तातडीने दाखल झाल्याने इतर वाहने वाचली. परंतु पाच ते सहा मोटारसायकली जळून खाक झाल्या....रेकॉर्ड रुमचे नुकसान टळलेतहसील व पोलीस स्टेशन परिसरात संपूर्ण तालुक्याचे महत्वाचे दस्त ऐवज (रेकॉर्ड) रूम व संपूर्ण तालुक्याची सात-बारा व आठ ‘अ’ चे नोंदी असलेली संगणक रूमही जवळच होती. सुदैवाने या दोन्ही खोल्यांचे नुकसान झाले नाही. या ठिकाणी स्वच्छतागृह असल्याने अनेक लोक लघुशंकेसाठी जातात. यामुळे अज्ञात व्यक्तीने धुम्रपान करून सिगारेट ओढून टाकली किंवा शेजारी असलेला कचरा पेटविल्याने ही आग लागली असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र अद्याप आगीचे कारण समजू शकले नाही.