अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 16:28 IST2021-02-22T16:27:59+5:302021-02-22T16:28:52+5:30
माहेरी गेलेल्या पत्नीस दुचाकीवरून सासरी आणण्यासाठी जाणाऱ्या पतीचा अज्ञात वाहनांच्या धडकेत जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर अंजनापूर शिवारात हॉटेल मनोदीप जवळ शनिवारी (दि. २०) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सोपान मंगल पवार (वय ३५, रा. कोळपेवाडी, ता. कोपरगाव) असे मृताचे नाव आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू
कोपरगाव : माहेरी गेलेल्या पत्नीस दुचाकीवरून सासरी आणण्यासाठी जाणाऱ्या पतीचा अज्ञात वाहनांच्या धडकेत जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर अंजनापूर शिवारात हॉटेल मनोदीप जवळ शनिवारी (दि. २०) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सोपान मंगल पवार (वय ३५, रा. कोळपेवाडी, ता. कोपरगाव) असे मृताचे नाव आहे.
मृत सोपान पवार हे संगमनेर तालुक्यातील आश्वि येथे आपल्या पत्नीस आणण्यास (एम.एच.-०२- ए. एन.-३६८४) जात होते. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अंजनापूर शिवारात हॉटेल मनोदीप नजीकच्या वळणावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सोपान पवार हे जागीच ठार झाले. दरम्यान, धडक दिल्यानतंर वाहन पसार झाले. शिर्डी पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.