उक्कलगाव परिसरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:19 AM2021-04-17T04:19:39+5:302021-04-17T04:19:39+5:30
उक्कलगाव : प्रवरा नदीपात्र परिसरात बिबट्यानंतर आता रानडुकरांचा धुमाकूळ सुरू झाला आहे. कुरणपूर येथील युवक गणेश उमाकांत चिंधे (वय ...
उक्कलगाव : प्रवरा नदीपात्र परिसरात बिबट्यानंतर आता रानडुकरांचा धुमाकूळ सुरू झाला आहे. कुरणपूर येथील युवक गणेश उमाकांत चिंधे (वय २५) हा शेतात पाणी भरत असताना रानडुकराने चावा घेऊन धडक दिल्याने जखमी झाला आहे. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. त्यास पुढील उपचारासाठी नगर येथे दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच वनाधिकारी बी.एस. गाढे, वनपाल विकास पवार दाखल झाले. त्यांनी कोणताही विलंब न करता पुढील उपचारासाठी जखमी तरुणाला नगर येथे खासगी रुग्णालयात भरती केले. परिसरात बिबट्या बरोबरच रानडुुकरांची संंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. प्रवरा नदीला पाणी भरपूर असल्याने मका, ऊस हे पीक त्यांना खाण्यासाठी मिळत आहे. कुरणपूर, फत्त्याबाद,मांडवे, कडीत,उक्कलगाव येथे रानडुकरांचे कळप दिसून येत आहेत.
-------