अनधिकृत वाळूसाठा : बांधकाम व्यावसायिकाला ४६ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 12:51 PM2018-08-23T12:51:30+5:302018-08-23T12:51:52+5:30

शहरातील नालेगाव येथे बांधकाम व्यवसायिकाने अनधिकृत १८४़५० ब्रास वाळूसाठा केल्याने महसूल विभागाने ४६ लाख ७३ हजार ६०० रूपयांचा दंड ठोठावला आहे. नगर तालुका तहसीलदारांनी ही कारवाई केली.

Unauthorized sandstone: A penalty of Rs 46 lakh for the builder | अनधिकृत वाळूसाठा : बांधकाम व्यावसायिकाला ४६ लाखांचा दंड

अनधिकृत वाळूसाठा : बांधकाम व्यावसायिकाला ४६ लाखांचा दंड

अहमदनगर : शहरातील नालेगाव येथे बांधकाम व्यवसायिकाने अनधिकृत १८४़५० ब्रास वाळूसाठा केल्याने महसूल विभागाने ४६ लाख ७३ हजार ६०० रूपयांचा दंड ठोठावला आहे. नगर तालुका तहसीलदारांनी ही कारवाई केली.
नालेगाव येथे ११ आॅक्टोबर २०१७ रोजी महावीर होम्स असे नाव असलेल्या बांधकाम व्यवसायिकाने अनधिकृत वाळूसाठा करून ठेवल्याबाबत नालेगाव येथील तलाठी यांनी तहसीलदार यांना अहवाल पाठविला होता. या वाळूचा पंचनाम करून तत्कालीन तहसीलदार यांनी सदर बांधकाम व्यवसायिकास नोटीस पाठवून खुलासा करण्याचे सांगितले होते.  बांधकाम व्यवसायिकाने हा वाळूसाठा अधिकृत असल्याबाबत तहसीलदारांना कळविले होते़. यावर महसूल विभागाने वाळू खरेदी केल्याच्या अधिकृत पावत्यांची मागणी केली होती. व्यवसायिक मूळ पावत्या देऊ न शकल्याने तहसीलदार यांनी दंड ठोठावला आहे.

Web Title: Unauthorized sandstone: A penalty of Rs 46 lakh for the builder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.