मोहट्याच्या सरपंचावरील ‘अविश्वास’ मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 10:56 AM2018-06-21T10:56:51+5:302018-06-21T13:27:12+5:30

तालुक्यातील मोहटे ग्रामपंचायतीचे सरपंच डॉ. हर्षवर्धन साहेबराव पालवे यांच्यावर ९ पैकी ७ ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायत कामात सरपंच विश्वासात घेत नसल्याने ग्रामपंचायतीचे कामे खोळबून विकास खुंटला असल्याचे करणे देत मंगळवारी अविश्वास ठराव दाखल केला होता. हा ठराव आज सकाळी ७ विरुध्द ० मतांनी मंजूर करण्यात आला.

The 'unbelief' on the sappanch of Mohit approved | मोहट्याच्या सरपंचावरील ‘अविश्वास’ मंजूर

मोहट्याच्या सरपंचावरील ‘अविश्वास’ मंजूर

पाथर्डी : तालुक्यातील मोहटे ग्रामपंचायतीचे सरपंच डॉ. हर्षवर्धन साहेबराव पालवे यांच्यावर ९ पैकी ७ ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायत कामात सरपंच विश्वासात घेत नसल्याने ग्रामपंचायतीचे कामे खोळबून विकास खुंटला असल्याचे करणे देत मंगळवारी अविश्वास ठराव दाखल केला होता. हा ठराव आज सकाळी ७ विरुध्द ० मतांनी मंजूर करण्यात आला.
पाथर्डी तालुक्यातील मोहटे ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक २०१५ मध्ये झाली होती. निवडणुकीनंतर सरपंचपदावरून गेली तीन वर्षापासून डॉ. हर्षवर्धन पालवे हे काम पाहत होते. मोहटे गावात गेली दोन महिन्यापासून पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाइनसाठी रस्ते उकरून ठेवले आहेत, परंतु काहीच काम झाले नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मोहटे ग्रामपंचायतीचा ११ लाखांचा दलित वस्ती विकास निधी अखर्चित राहून मागे गेल्याने पंधरा दिवसापूर्वी गटविकास अधिकारी जगदीश पालवे यांनी सरपंच डॉ. पालवे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांना ‘ग्रामपंचायत बरखास्त का करण्यात येवू नये’ अशी नोटीस पाठवली होती. त्यामुळे सरपंच डा.ॅ पालवे यांच्या वरील नाराजी वाढली होती.
ग्रामपंचायतीच्या ९ सदस्यापैकी ७ सदस्यांनी डॉ. हर्षवर्धन साहेबराव पालवे हे ग्रामपंचायत सदस्याना विश्वासात न घेता मनमानी करून मोहटे गावाच्या विकासाठी ठरवलेली विकासात्मक ध्येय धोरणांचा जाणीव पूर्वक भंग केला आहे. गावचा सर्वांगीण विकास होण्यासाठी नदी खोलीकरण, अंतर्गत रस्ते विकास याबाबत प्रयत्न केले नाहीत. गावाच्या विकासाच्या दृष्टीकोनातून ग्रामसभेने घेतलेले ठराव डॉ. पालवे यांनी स्वत:च्या मनाने बदल केले. गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत शासनाच्या विविध विकास योजनेपासून गावातील गरिबांना वंचित ठेवले. विविध शासकीय योजना व वित्त आयोगानुसार मजूर निधीची इतर ग्रामपंचायत सदस्यांना माहिती दिली नाही. दलित वस्ती अंतर्गत आलेला निधी खर्च करण्यासाठी ई निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्यामुळे ११ लाखा रुपयांचा निधी शासनाला परत गेला असल्याने डॉ. हर्षवर्धन पालवे यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव आणल्याचे सदस्यांनी सांगितले. ग्रामपंचायत सदस्य आसाराम देवराम दहिफळे, नंदाबाई भास्कर दहिफळे, उपसरपंच दत्तात्रय लक्ष्मण दहिफळे,प् ाारूबाई भागवत दहिफळे, आशाबाई बाबासाहेब दहिफळे, अविनाश मुरलीधर फुंदे, ललिता इंदुलाल सोनवणे यांनी मंगळवारी तहसीलदार नामदेव पाटील यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. याबाबत आज सकाळी ९ वाजता ग्रामपंचायत कार्यालय मोहटे येथे तहसीलदार यांच्या उपस्थितीत अविश्वासाच्या बाजूने ७ विरुद्ध ० असे मतदान होवून अविश्वास ठराव बहुमताने संमत झाला. सरपंच डॉ. हर्षवर्धन पालवे व ग्रामपंचायत सदस्य मंदाबाई पांडुरंग दहिफळे हे ठरावाच्या वेळी गैरहजर होते.

Web Title: The 'unbelief' on the sappanch of Mohit approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.