साईदरबारातील पालखी सोहळा पुर्ववत सुरू करा; राष्ट्रवादीची संस्थानकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 03:17 PM2020-11-22T15:17:04+5:302020-11-22T15:17:47+5:30
दीपावली पाडव्याला साईमंदिर भाविकांसाठी खुले झाले. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगीत केलेली पालखी पुर्ववत सुरू करावी. ग्रामस्थांसाठी द्वारकामाई दर्शन सुलभरीत्या सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने रविवारी एका निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
शिर्डी : दीपावली पाडव्याला साईमंदिर भाविकांसाठी खुले झाले. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगीत केलेली पालखी पुर्ववत सुरू करावी. ग्रामस्थांसाठी द्वारकामाई दर्शन सुलभरीत्या सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने रविवारी एका निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. साईसंस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांची राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी भेट घेवून या संदर्भात मागणी केली. यावेळी सुधाकर शिंदे, रमेशराव गोंदकर, महेंद्र शेळके, निलेश कोते, अमित शेळके, संदीप सोनवणे, गणेश गोंदकर व दिपक गोंदकर यांची उपस्थीती होती. कोरोनामुळे १७ मार्च रोजी बंद झाल्यापासुन दर गुरूवारचा पालखी सोहळा सुद्धा बंद करण्यात आला. नुकतेच साईमंदिर भाविकासाठी खुले करण्यात आले आहे. त्या पाठोपाठ गुरूवारची पालखी सुद्धा सुरू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. द्वारकामाईत दर्शनासाठी समाधी मंदिरात जाणारी रांग वळवण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना बाहेरच्या बाजूने जाणे अशक्य झाले आहे. तेथेही ग्रामस्थांसाठी सुलभ दर्शनाची व्यवस्था करावी, असा आग्रह ही निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. |