दौंड-मनमाड रेल्वेमार्गावरील सहा पॅसेंंजर पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 04:09 PM2018-07-19T16:09:09+5:302018-07-19T16:09:27+5:30

दौंड मनमाड मार्गावरील सहा पॅसेंजर  १६ जुलैपर्यंत बंद करण्यात आल्या होत्या त्या १७ जुलैपासून सुरु करण्यात आल्या आहेत.

Undo six passes on the Daund-Manmad railroad | दौंड-मनमाड रेल्वेमार्गावरील सहा पॅसेंंजर पूर्ववत

दौंड-मनमाड रेल्वेमार्गावरील सहा पॅसेंंजर पूर्ववत

श्रीरामपूर : दौंड मनमाड मार्गावरील सहा पॅसेंजर  १६ जुलैपर्यंत बंद करण्यात आल्या होत्या त्या १७ जुलैपासून सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दैनंदिन नोकरीला, विद्यालयात, उद्योगासाठी जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे.
दौंड - नांदेड १८ जुलै ते १ आॅगस्ट पर्यंत, नांदेड ते दौंड १७ ते ३१ जुलैपर्यंत, पुणे ते निजामाबाद १४ ते ३० जुलैपर्यंत व निजामाबाद ते पुणे १६ जुलै ते १ आॅगस्टपर्यंत व शिर्डी पंढरपूर १७ ते३१ जुलैपर्यंत, पंढरपूर ते शिर्डी १७ ते ३१ जुलैपर्यंत सुरु राहणार आहेत. दौंड मनमाड मार्गावर बराच काळ साधारण गाड्या नसल्याने या मार्गावर जलद व धिम्या लोकल सुरु केल्यास प्रवाशांची गैरसोय दूर होऊन रेल्वे प्रशासनाला आर्थिक फायदा होऊ शकतो. याची रेल्वे प्रवासी संघटनेने दखल घेऊन पुढील योग्य ती पावले उचलावीत अशी प्रवाशांची मागणी आहे.
श्रीरामपूर रेल्वे स्थानकासमोर प्रवाशांची ने-आण करण्यासाठी आलेल्या वाहनांना जबरदस्तीने वाहनतळाची सक्ती केली जाते. त्यामुळे विनाकारण आर्थिक भुर्दंड बसतो. शिवाय गाडी चुकण्याची वेळ येते या समस्येकडे प्रवासी संघटनेने लक्ष देणे गरजेचे आहे.

Web Title: Undo six passes on the Daund-Manmad railroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.