संगमनेरातील प्रवरा नदीपात्रात झोपून अनोखे आंदोलन, वाळू उपशाला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 09:49 AM2021-06-16T09:49:34+5:302021-06-16T09:50:54+5:30
संगमनेर: वाळू उपसा थांबविण्याची मागणी नागरिकांनी करत बुधवारी (दि. १६) गंगामाई घाट परिसरात नदीपात्रात झोपून अनोखे आंदोलन केले.
अवैधरित्या वाळू उपसा; अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन
संगमनेर : प्रवरा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसली जात आहे. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. वाळू उपसा थांबविण्याची मागणी नागरिकांनी करत बुधवारी (दि. १६) गंगामाई घाट परिसरात नदीपात्रात झोपून अनोखे आंदोलन केले.
कासारा दुमाला ते संगमनेर खुर्द येथील मोठ्या पुलापर्यंत रात्रं-दिवस अवैधरित्या वाळू उपसली जाते आहे. त्यामुळे नदी परिसरातील पुरातन घाट, मंदिरांना धोका निर्माण झाला आहे. येथून वाळू उपसा बंद होण्याची आमची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र, याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. वाळू उपसा न थांबल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.