नियमबाह्य मद्य विकल्याने ८ दुकाने, १४ परमीटरुमला सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 01:41 PM2019-10-16T13:41:30+5:302019-10-16T13:41:57+5:30

विधानसभा निवडणूककाळात नियमबाह्य मद्यविक्री केल्याने उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील आठ दारु विक्री दुकाने व १४ परमीटरुम बंद केले आहेत़ उत्पादन शुल्कचे अधीक्षक पराग नवलकर यांनी हे आदेश दिले आहेत़ 

Unlawful selling of alcoholic liquor, 3 shops, 3 seating permits | नियमबाह्य मद्य विकल्याने ८ दुकाने, १४ परमीटरुमला सील

नियमबाह्य मद्य विकल्याने ८ दुकाने, १४ परमीटरुमला सील

अहमदनगर : विधानसभा निवडणूककाळात नियमबाह्य मद्यविक्री केल्याने उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील आठ दारु विक्री दुकाने व १४ परमीटरुम बंद केले आहेत़ उत्पादन शुल्कचे अधीक्षक पराग नवलकर यांनी हे आदेश दिले आहेत़ 
निवडणूक आचारसंहिता काळात अवैध मद्य विक्री होऊ नये, यासाठी उत्पादन शुल्कने भरारी पथकांची नियुक्ती करून तपासणी मोहीम सुरू केली आहे़ पथकाच्या तपासणीत परमीटरुम अथवा दारुचे दुकान वेळेत बंद न करणे, मोठ्या प्रमाणात एकाच मद्य विक्री करणे, निवडणूक आयोगास दैनंदिन विक्री माहिती न देणे,  एमआरपी पेक्षा ८ ते १०  रुपये जास्त दराने विक्री करणे,  निरीक्षणाच्या वेळी माहिती देण्यात आली नाही, मध्यरात्रीपर्यंत हॉटेल सुरू ठेवणे, परवाना कक्षाबाहेर           मोठ्या प्रमाणात मद्य सेवन करायला देणे, निवडणूक आयोगाच्या   आदेशाचे पालन न करणे आदी विसंगती आढळून आल्याने ही दुकाने व हॉटेल बंद करण्याचे आदेश दिले असून, तीन दिवसांत त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे़ 
बारा पथके तैनात 
च्उत्पादन शुल्क विभागाने आचारसंहिता कालावधीत एकूण १२ पथके  तयार केली असून या पथकांमार्फत अवैध दारुविक्रीबाबत तपासणी केली जात आहे़  या पथकात निरीक्षक अ विभाग, ब विभाग, निरीक्षक  श्रीरामपूर, कोपरगाव व संगमनेरमध्ये असलेल्या कर्मचाºयांचा समावेश आहे़ 

Web Title: Unlawful selling of alcoholic liquor, 3 shops, 3 seating permits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.