अनलॉकमध्ये विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीत शाळा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:28 AM2021-06-16T04:28:28+5:302021-06-16T04:28:28+5:30
शिक्षकांना विद्यार्थ्यांकडून जुनी पुस्तके जमा करून घेण्याचे आदेश त्यात देण्यात आले. नवीन प्रवेशित मुलांना ही पुस्तके आता दिली जात ...
शिक्षकांना विद्यार्थ्यांकडून जुनी पुस्तके जमा करून घेण्याचे आदेश त्यात देण्यात आले. नवीन प्रवेशित मुलांना ही पुस्तके आता दिली जात आहेत. वर्गशिक्षकांना विद्यार्थ्यांची यादी तयार करावयाची आहेत. त्यात मोबाइलधारक विद्यार्थ्यांचे व्हाॅट्सॲप ग्रुप तयार केले जाणार असून, त्यावरून अध्यापन सुरू केले जाणार आहे.
शिक्षकांना युट्यूबचा वापर करण्याची सूचना देण्यात आली आहे. त्याचबरोबर ऑडिओ क्लिप तयार करून गोष्टींद्वारे अध्यापन ही संकल्पना काही तालुक्यांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न आहे.
---------
जिल्ह्यातील एकूण शाळा (१ ते १२ वी)
५३७६
विद्यार्थी
९०६०३३
शिक्षक ३२९५४
---------
गुरुजींची शाळा भरली
शिक्षण संचालकांनी पहिली ते नववीपर्यंतच्या शिक्षकांकरिता ५० टक्के उपस्थिती तर त्यापुढील शिक्षकांकरिता शंभर टक्के उपस्थितीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शिक्षक शाळांमध्ये दाखल झाले आहेत. विद्यार्थी नसले तरी गुरुजींनी मात्र उपस्थिती लावली आहे. प्रत्येक शिक्षकाला वर्गात बसण्याचे सक्तीचे आदेश आहेत.
----------
शाळा सुरू करायची म्हटली तर..
प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यापूर्वी साफसफाईचे काम हाती घेण्यात आले होते. त्याकरिता शाळा व्यवस्थापन समितीने ग्रामपंचायतींकडून मदत घेतली. त्यामुळे सरकारचे आदेश येताच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळा सुरू करता येतील, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.
----------
जिल्ह्यातील सर्व शाळांवर शिक्षक दाखल झाले आहेत. सर्वांना ऑनलाइन बैठकीतून शैक्षणिक कामकाजाविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.
-शिवाजी शिंदे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, नगर.
-----