दोन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:20 AM2021-04-10T04:20:35+5:302021-04-10T04:20:35+5:30

सचिन चांगदेव केदारी (रा. देवाचा मळा, संगमनेर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याविरोधात पीडित अल्पवयीन मुलगा व दुसऱ्या ...

Unnatural abuse of two minors | दोन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार

दोन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार

सचिन चांगदेव केदारी (रा. देवाचा मळा, संगमनेर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याविरोधात पीडित अल्पवयीन मुलगा व दुसऱ्या पीडित अल्पवयीन मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील दोन अल्पवयीन मुलांना सचिन केदारी याने प्रथमत: धमकी दिली. नंतर आमिष दाखवून तीस रुपये खर्चासाठी दिले. तसेच स्कुटी चालवायला शिकवतो, असेही आमिष त्याने दाखविले. त्यानंतर गोल्डन सिटीच्या पुढे असलेल्या काटवनात या मुलांना तो घेऊन गेला. तेथे त्यांच्यासोबत त्याने अनैसर्गिक कृत्य केले.

हा प्रकार पहिल्यांदा २८ मार्चला रात्री आठ वाजेच्या सुमारास घडला. तर ६ एप्रिलला दुपारी दीडच्या सुमारास दुसऱ्यांदा असा प्रकार या दोन मुलांसोबत आरोपीने केला. पहिल्यावेळी घडल्या प्रकाराबाबत मुलांनी घरी काही सांगितले नाही. मात्र, दुसऱ्यांदा पुन्हा तसेच घडल्यानंतर मुलांनी सचिन केदारी याने केलेल्या अनैसर्गिक कृत्याबाबत घरी सांगितले.

या दोन्ही अल्पवयीन मुलांच्या कुटुंबीयांनी शहर पोलीस ठाणे गाठत घडलेला प्रकार पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना सांगितला. पोलिसांनी केदारीविरोधात बालकांचे लैंगिक अपराध यापासून संरक्षण- २०१२ कलम ६ प्रमाणे गुन्हा दाखल केला. केदारी याला त्याच्या घरातून अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत (दि. १२) पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी पुढील तपास करीत आहेत.

.............

आरोपी दोन मुलांचा बाप

आरोपी सचिन चांगदेव केदारी हा ३२ वर्षीय तरुण असून, त्याचे लग्न झालेले आहे. त्याला पत्नी व दोन मुले असून, संबंधित तरुण हा उच्चशिक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Unnatural abuse of two minors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.