सोमठाणेत बाप-लेकीची सदस्यपदी बिनविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:17 AM2021-01-09T04:17:16+5:302021-01-09T04:17:16+5:30
तीसगाव : तीसगाव (ता. पाथर्डी) परिसरातील सोमठाणे खुर्द येथील ग्रामपंचायत तरुणाई-ज्येष्ठांच्या समन्वयातून पहिल्यांदाच बिनविरोध झाली. येथे बाप-लेकीला ग्रामपंचायत सदस्यपदी ...
तीसगाव : तीसगाव (ता. पाथर्डी) परिसरातील सोमठाणे खुर्द येथील ग्रामपंचायत तरुणाई-ज्येष्ठांच्या समन्वयातून पहिल्यांदाच बिनविरोध झाली. येथे बाप-लेकीला ग्रामपंचायत सदस्यपदी संधी देण्यात आली. गेली पंधरा वर्षे बिनविरोध होणाऱ्या पारेवाडी ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होणार आहे.
पांडुरंग शिदोरे, कांचन शिदोरे असे निवड झालेल्या बाप-लेकीचे नाव आहे. सोमठाणे येथे कानिफनाथ शिदोरे, दिलीप शिदोरे, भाऊसाहेब जाधव, वृद्धेश्वर दूध संघाचे संचालक सतीश कराळे, माजी सरपंच संभाजी शिदोरे आदींनी मांडलेली बिनविरोधची संकल्पना सर्वमान्य ठरली. बिनविरोध सदस्यांमध्ये पांडुरंग शिदोरे व कांचन शिदोरे या बाप-लेकीला ग्रामपंचायत सदस्यपदाची संधी देण्यात आली आहे. बिनविरोध सदस्य असे : माजी सरपंच पांडुरंग शिदोरे, शिवाजी कराळे, कांचन पांडुरंग शिदोरे, गणेश आदिनाथ शिदोरे, संजीवनी दिलीप शिदोरे, रेखा सतीश शिदोरे, प्रियंका प्रशांत शिदोरे. सोमठाणे ग्रामपंचायतची सदस्य संख्या सात आहे. गत दहा वर्षांपूर्वी झालेल्या बिनविरोध निवडणूक पर्वास पुन्हा तरुणाई व ज्येष्ठांच्या समन्वयाने आरंभ झाला आहे.
सोमठाणे शिवेलगतच्या निर्मलग्राम पारेवाडी येथे सेवा संस्थेसह ग्रामपंचायतीतही गेल्या पंधरा वर्षांपासून बिनविरोध निवडणुकांचा इतिहास आहे. यावर्षी तरुणाई ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने बिनविरोधची परंपरा खंडित झाली असून, दुरंगी लढत होत आहे.