बिनविरोध ग्रामपंचायतीला मिळणार ३० लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:28 AM2020-12-30T04:28:06+5:302020-12-30T04:28:06+5:30
कोरोना महामारीने आणि नैसर्गिक आपल्याला खूप मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे गावातील सर्व गट-तट बाजूला ठेऊन ...
कोरोना महामारीने आणि नैसर्गिक आपल्याला खूप मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे गावातील सर्व गट-तट बाजूला ठेऊन निवडणुकीसाठी होणाऱ्या खर्चास फाटा देत गावच्या विकासासाठी व हितासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन काम करायचे आहे. आर्थिक खर्च वाचवण्याबरोबरच गावात असलेल्या राजकीय वादांना संपुष्टात आणण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करा अन् गावच्या विकासासाठी आपल्या गावांना ३० लाखांचा विकासनिधी घ्या, अशी साद आमदार रोहित पवार यांनी घातली आहे.
बिनविरोध निवडणुका पार पाडलेल्या मोठ्या ग्रामपंचायतींना सी.एस.आर. फंडाच्या माध्यमातूनही अधिकचा निधी देण्यात येणार असल्याचे पवार यांनी बोलताना सांगितले. बिनविरोध निवडणूक ही प्रक्रिया गावच्या हिताची ठरणार आहे. अनेक ग्रामपंचायती बिनविरोध होण्यासाठी सर्वच सुजाण नागरिक प्रयत्नशील असतील, असा विश्वास आ. रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.
....
...तर याद राखा,गाठ माझ्याशी आहे
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर सर्वसामान्य लोकांना जर कुणी दमबाजी, दबावतंत्र, दडपशाही व अन्य काही मार्गाचा अवलंब करून त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांची कशीच गय केली जाणार नाही. असा कोणताही प्रकार कुणी करू नये. अन्यथा लक्षात ठेवा गाठ माझ्याशी आहे., असा सज्जड दमच आमदार रोहित पवारांनी या निमित्ताने भरला आहे.
...