चिमुरडीवर अनैसर्गिक अत्याचार : आरोपीस मरेपर्यत तुरुंगवास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 02:59 PM2018-08-07T14:59:51+5:302018-08-07T15:06:53+5:30
पावणे तीन वर्षांच्या चिमुरडीवर अनैसर्गिक अत्याचार प्रकरणातील आरोपी बाळू गंगाधर बर्डे (रा. राहुरी) यास जिल्हा व सत्र न्यायालयाने आज नैसर्गिक मरेपर्यत तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांनी हा निकाल दिला.
अहमदनगर : पावणे तीन वर्षांच्या चिमुरडीवर अनैसर्गिक अत्याचार प्रकरणातील आरोपी बाळू गंगाधर बर्डे (रा. राहुरी) यास जिल्हा व सत्र न्यायालयाने आज नैसर्गिक मरेपर्यत तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांनी हा निकाल दिला.
डिसेंबर २०१६ मध्ये अहमदनगर रेल्वे स्टेशन परिसरातून पावणे तीन वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण झाले होते. त्यानंतर या चिमुरडीवर आरोपीने अनैसर्गिक अत्याचार केला होता. चिमुरडीवर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. कोतवाली पोलिसांनी सखोल तपास करून बाळू गंगाधर बर्डे यास संशयित म्हणून अटक केली होती. तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता अर्जुन पवार यांनी काम पाहिले. न्यायालयाने शुक्रवारी सायंकाळी आरोपी बर्डे यास अल्पवयीन मुलीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते.