आमदार भांगरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:19 AM2021-01-22T04:19:14+5:302021-01-22T04:19:14+5:30
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ, मंत्री शंकर गडाख उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यास ...
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ, मंत्री शंकर गडाख उपस्थित राहणार आहेत.
मेळाव्यास शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे, आमदार किरण लहामटे, शेंडीचे सरपंच दिलीप भांगरे, जिल्हा परिषद सदस्या सुनीता भांगरे, अमित भांगरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केले आहे.
अकोलेचतून काँग्रेस पक्षाकडून सर्वप्रथम आमदार (१९५२) झालेले गोपाळराव, त्यानंतर अकोले विधानसभेवर तीन वेळेस आमदार म्हणून निवडून गेलेले यशवंतराव भांगरे यांनी शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ राहून जनसेवक म्हणून लौकिक प्राप्त केला होता. १९७७ ला त्यांनी मधुकर पिचड यांना पराभूत केले. त्यानंतर पिचड घराण्याने १९८० ते २०१४ पर्यंत तालुक्यावर राज्य केले. राष्ट्रवादिचे डॉ. किरण लहामटे हे आमदार झाले. शेतकरी मेळाव्याच्या अनुषंगाने तालुक्यातील पाटपाणी, जलसिंचन, जलसंधारण, पर्यटन, वळण बंधारे, धरण बुडीत बंधारे, प्रोफाईल वॉल, हिवरानाला- साम्रद- कुमशेत- बिताका प्रकल्प प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास भांगरे यांनी यावेळी व्यक्त केला. भानुदास तिकांडे, सूरेश खांडगे, विकास बंगाळ, अमित नाईकवाडी आदी यावेळी उपस्थित होते.