विषाणूला रोखण्यासाठीच रेमडेसिविरचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:20 AM2021-04-13T04:20:42+5:302021-04-13T04:20:42+5:30
अहमदनगर : कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर पहिल्या दहा दिवसांमध्ये शरीरात गेलेल्या कोरोना विषाणूची गुणात्मक पद्धतीने वाढ होते. याच काळात श्वसनाचा ...
अहमदनगर : कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर पहिल्या दहा दिवसांमध्ये शरीरात गेलेल्या कोरोना विषाणूची गुणात्मक पद्धतीने वाढ होते. याच काळात श्वसनाचा त्रास असलेल्या रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शन दिले तर शरीरातील कोरोनाची वाढ रोखण्यास मदत होऊन रुग्ण बरा होतो. गतवर्षीपेक्षा गेल्या दोन महिन्यांमधील रुग्णांची वाढणारी संख्या मोठी आहे. त्यामुळे रुग्णांना लवकर बरे करण्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा वापरही वाढला, असे शहरातील तज्ज्ञांनी सांगितले.
गेल्या दोन महिन्यांत रोज सरासरी १८०० ते २००० जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. त्यात बरे होण्याचे प्रमाण चांगले असले तरी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही पाच-सहा हजारापर्यंत आहे. तीन महिन्यांपूर्वी कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाल्याने कंपन्यांनी रेमडेसिविरचे उत्पादन थांबवले होते. अशा स्थितीत अचानक कोरोनाचे रुग्ण वाढल्याने रेमडेसिविरची मागणी वाढली. हे इंजेक्शन तयार करण्यासाठी १५-१६ दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे मागणीप्रमाणे त्वरित इंजेक्शन मिळणे कठीण असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अनिल आठरे यांनी सांगितले.
------------
रेमडेसिविर का वापरले जाते ? तज्ज्ञांनी दिली ही कारणे
संसर्ग झाल्यानंतर पहिल्या दहा दिवसांत विषाणू आक्रमक असतो.
हे इंजेक्शन जगभरात प्रायोगिक तत्त्वावरच दिले जात आहे.
इंजेक्शनमुळे रुग्णांवर चांगले परिणाम झाल्याचे दिसून आले
इम्युनिटी वाढविण्यासाठी चांगली मदत होते
अँटिव्हायरस औषध म्हणून प्रभावी परिणाम
इंजेक्शन दिल्यावर त्वरित ताप कमी होतो
चार दिवसांत रुग्ण ठणठणीत होण्यास मदत
---------------------
कोणत्या रुग्णाला रेमडेसिविर द्यावे ?
रेमडेसिविर इंजेक्शनचा राज्यभर तुटवडा निर्माण झालेला आहे. सदरचे इंजेक्शन हे कोणत्याही रुग्णाला दिले जाते. त्यामुळे त्याची मागणी वाढली आणि ज्याला जास्त गरज आहे, अशा रुग्णांना रेमडेसिविर उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तज्ज्ञांचे मत घेऊन रेमडेसिविर कोणाला द्यावे, याबाबतचा एक आदेश जारी केला आहे.
त्यानुसार अशा रुग्णाला हे इंजेक्शन द्यावे. ज्याचा..