मुळा धरणाच्या इतिहासात रब्बी आवर्तनाचा निचांकी वापर; उजवा कालवा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 02:26 PM2020-02-22T14:26:11+5:302020-02-22T14:27:36+5:30

पाटबंधारे खात्याने नियोजन केल्यामुळे मुळा धरणाच्या इतिहासातील ४८ वर्षात रब्बी आवर्तनात निचांकी पाण्याचा वापर झाला आहे. उजव्या कालवा बंद झाला असून के वळ ३ हजार २७० दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला आहे.

The use of squeezing rabbi variants in the history of the root system; Right canal closed | मुळा धरणाच्या इतिहासात रब्बी आवर्तनाचा निचांकी वापर; उजवा कालवा बंद

मुळा धरणाच्या इतिहासात रब्बी आवर्तनाचा निचांकी वापर; उजवा कालवा बंद

राहुरी : पाटबंधारे खात्याने नियोजन केल्यामुळे मुळा धरणाच्या इतिहासातील ४८ वर्षात रब्बी आवर्तनात निचांकी पाण्याचा वापर झाला आहे. उजव्या कालवा बंद झाला असून के वळ ३ हजार २७० दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला आहे. भरारी पथकाने रात्रंदिवस कमी कर्मचा-यांमध्ये पाण्याचा काटकसरीने वापर केल्याचे समोर आहे़.
कालव्यावर असलेल्या २५० विद्युत मोटारी व २५० पाईप काढण्यात आले होते़. रब्बीसाठीचे उजव्या कालव्याला दरवर्षी ५ हजार दशलक्ष घनफुटापेक्षा अधिक पाण्याचा वापर केला जात होता़. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाण्याच्या नासडीवर चिंता व्यक्त करण्यात आली होती़. ३ हजार ५०० दशलक्ष घनफूट  पाणी वापर करण्याचा निर्णय घेतला होता़. प्रत्यक्षात ३ हजार २५० दशलक्ष घनफूट  पाणी वापरात आले आहे़.
 उजव्या कालव्याखाली ४० हजार हेक्टर पिकाखालील क्षेत्र ओलिताखाली आले आहे़.  उजव्या कालव्याचे आवर्तन २९ दिवस चालले़. आवर्तनाचा कालावधीही कमी झाला़ सर्वांचे भरणे झाल्यानंतर पाणी बंद करण्यात आले़. यंदा मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पाण्याचा अपव्यय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. पाण्याचा काटकसरीने वापर झाल्याने शेतक-यांना योग्य प्रमाणावर पाणी नजिकच्या काळात उपलब्ध होणार आहे़.

Web Title: The use of squeezing rabbi variants in the history of the root system; Right canal closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.