देवीभोयरे फाटा येथील शिबिराला उर्त्स्फूत प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:25 AM2021-07-07T04:25:41+5:302021-07-07T04:25:41+5:30
निघाेज : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रदेश प्रवक्ते जितेश सरडे यांच्या वाढदिवसानिमित्त देवीभोयरे फाटा (ता. पारनेर) ...
निघाेज : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रदेश प्रवक्ते जितेश सरडे यांच्या वाढदिवसानिमित्त देवीभोयरे फाटा (ता. पारनेर) येथे सोमवारी आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरात १३३ जणांनी रक्तदान केले. यामध्ये युवती, महिलांचाही मोठा सहभाग होता.
आमदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून व ‘लोकमत’च्या सहकार्यातून हे शिबिर पार पडले.
सकाळी अकरा वाजता ‘लाेकमत’चे संस्थापक स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा ऊर्फ बाबूजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान शिबिरास प्रारंभ झाला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या तथा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या राणी लंके, पारनेर तालुका आत्मा समितीचे अध्यक्ष ॲड. राहुल झावरे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष ठकाराम लंके, नीलेश लंके युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजूभाऊ औटी, तहसीलदार ज्योती देवरे, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, सोमनाथ वरखडे, देवीभोयरचे सरपंच विठ्ठल सरडे, संदीप चौधरी, श्रीकांतजी चौरे, विकास शेटे, ज्ञानेश्वर लंके, राहुल शेटे, उद्योजक किशोर यादव, डॉ. बाळासाहेब कावरे, दत्ता येवले आदी उपस्थित होते. आमदार नीलेश लंके यांचे आई-वडीलही यावेळी उपस्थित होते. रक्तदान शिबिरात युवकांबरोबरच युवती, महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला. रात्री आठ वाजेपर्यंत शिबिर सुरू होते. १३३ जणांनी येथे रक्तदान केले. पिंपरी-चिंचवड येथील मोरया ब्लड बँकेचे रक्तदान शिबिरास सहकार्य लाभले.
मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचाही तालुक्यातील कान्हूर पठार येथे प्रारंभ झाला.
‘लोकमत’च्या रक्तदान मोहिमेचे राणी लंके व विजय महाराज मुळे यांनी कौतुक केले.