आरटीओ कार्यालयात निरीक्षकांची पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:25 AM2021-07-07T04:25:44+5:302021-07-07T04:25:44+5:30
चार दिवसात निरीक्षकांची नियुक्ती न केल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला. चालक-मालक प्रतिनिधी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल थोरात, पश्चिम ...
चार दिवसात निरीक्षकांची नियुक्ती न केल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला. चालक-मालक प्रतिनिधी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल थोरात, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. वाहनाच्या योग्यता प्रमाणपत्र चाचणी त्वरित पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात यावी, रिक्त निरीक्षकांची नियुक्ती करावी, कार्यालयातील निरीक्षकांची नगर येथे केलेली प्रतिनियुक्ती रद्द करावी, अशा संघटनेच्या प्रमुख मागण्या होत्या.
आंदोलनात जिल्हा टॅक्सी असोसिएशनचे अध्यक्ष सुनील मुथा यांनी आंदोलनकर्ते व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. निरीक्षकांअभावी सर्वच कामकाज ठप्प आहे. त्यामुळे कार्यालय सुरू ठेवण्यात काहीही अर्थ नाही. मागण्यांसाठी टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश डगळे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. याप्रश्नी वरिष्ठांशी चर्चा करण्यात येईल. अधिकारी उपलब्ध झाल्यानंतर कामकाज सुरळीत होईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
आंदोलनात सल्लाउद्दीन शेख, राजू वमने, गणेश सरोदे, राजेश शदे, एजाज शेख, विकी गव्हाणे, विजय पाठक, अल्ताफ पठाण, सतीश टापसे, निलेश खैरनार, राजू शेख, दत्तू वडितके, कय्यूम पठाण, योगेश हांडोरे, राहुल तपगिर, गणी सय्यद, साईन खान, रवी रत्ती, सुभाष जाधव, पी. के. वमने, जावेद शेख, सुल्तान पठाण, मुबीन बागवान सहभागी झाले होते.
---------