सारोळा सोमवंशी येथे लसीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:22 AM2021-05-21T04:22:46+5:302021-05-21T04:22:46+5:30
विसापूर : सारोळा सोमवंशी (ता. श्रीगोंदा) येथे कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढल्यामुळे सारोळा सरपंच उज्ज्वला आढाव यांनी गावात लसीकरण व ...
विसापूर : सारोळा सोमवंशी (ता. श्रीगोंदा) येथे कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढल्यामुळे सारोळा सरपंच उज्ज्वला आढाव यांनी गावात लसीकरण व तपासणी मोहीम राबविण्याबाबत मागणी केली होती. त्यामुळे अखेर आरोग्य विभागाने बुधवारी (दि.१९) सारोळा सोमवंशी येथे लसीकरण आणि कोरोना तपासणी मोहीम राबविली. राहुल आढाव व त्यांच्या सहकाऱ्यांनी मदत केल्याने वैद्यकीय टीमला काम करणे सुलभ झाले. या ठिकाणी ११५ ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. ६६ नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली. यापैकी चार रुग्ण पॉझिटिव्ह सापडले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर व पिंपळगाव पिसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ.जयदेवी राजेकर यांचे ग्रामस्थांनी आभार मानले. यावेळी उद्योजक अतुल लोखंडे यांनी या ठिकाणी भेट देऊन मार्गदर्शन केले. सरपंच उज्ज्वला आढाव, उपसरपंच अंजाबापू कवाष्टे, युवा नेते राहुल आढाव, ग्रामपंचायत सदस्य विष्णू नवले, संदीप ननवरे, अर्जुन आढाव, भाऊसाहेब लोंढे, दाऊद सय्यद, पोलीसपाटील कल्याण उदार, विजय आढाव, प्रवीण मापारे, बापू आढाव, दत्ता आगलावे, सुरेश आढाव, अक्षय कवाष्टे, राजेंद्र उदार, संकेत नवले, किरण नवले यांनी नियोजनासाठी परिश्रम घेतले.
200521\fb_img_1621491379075.jpg
सारोळा सोमवंशी येथे लसीकरण व कोरोना तपासणी मोहीम राबविण्यात आली.