कोपरगावात पाच दिवसापासून लसीचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:22 AM2021-05-06T04:22:32+5:302021-05-06T04:22:32+5:30
कोपरगाव : ग्रामीण रुग्णालयात ४५ वर्षीय वयोगटातील नागरिकांना कोविडशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोनही लस गेल्या पाच दिवसापासून उपलब्ध नसल्यामुळे ...
कोपरगाव : ग्रामीण रुग्णालयात ४५ वर्षीय वयोगटातील नागरिकांना कोविडशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोनही लस गेल्या पाच दिवसापासून उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
राज्यात ३० एप्रिल पूर्वी ४५ वर्ष वय असलेल्या नागरिकांना लसीकरणाचा टप्पा सुरु होता. याच दरम्यान त्यातील बहुतांश नागरिकांचा दुसऱ्या लसीचा टप्पा सुरु होता. मात्र, लस उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात हेळसांड सुरु होती. त्यातच शासनाने १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांना १ मे पासून लसीकरणाची घोषणा केली. त्यामुळे लसीची आणखीनच मागणी वाढली. त्यामुळे ४५ वर्ष वयोगटातील नागरिकांच्या दुसऱ्या डोसचा तुटवडा झाला निर्माण आहे. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात ४५ वर्ष वयोगटातील नागरिकांचे अखेरचे लसीकरण हे शुक्रवारी ३० एप्रिलला झाले होते. दरम्यान बुधवारी सायंकाळी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लस उपलब्ध झाल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.