वैजूबाभूळगावात दिव्यांग, निराधारांना घरोघर कोरोना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:22 AM2021-09-11T04:22:15+5:302021-09-11T04:22:15+5:30

करंजी : पाथर्डी तालुक्यातील वैजूबाभूळगाव येथे दिव्यांग, निराधार, गरोदर माता यांना घरोघर कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. तालुक्यातील असा ...

In Vaijubabhulgaon, the disabled and the homeless are vaccinated from house to house | वैजूबाभूळगावात दिव्यांग, निराधारांना घरोघर कोरोना लस

वैजूबाभूळगावात दिव्यांग, निराधारांना घरोघर कोरोना लस

करंजी : पाथर्डी तालुक्यातील वैजूबाभूळगाव येथे दिव्यांग, निराधार, गरोदर माता यांना घरोघर कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. तालुक्यातील असा पहिलाच उपक्रम आहे. यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.

तिसगाव व मिरी आरोग्य केंद्रामार्फत गावोगावी कोरोना लस देण्यात येत आहे. मात्र तालुक्यातील वैजूबाभूळगाव येथे मिरी आरोग्य केंद्रांतर्गत लोहसर उपकेंद्रामार्फत वैजूबाभूळगाव येथे घरोघरी कोरोना लस देण्यात आली. त्यामुळे गावातील अंध, अपंग, गरोदर महिला, निराधार, वयोवृद्ध अशा सर्व वयोगटांतील लोकांना लाभ मिळाला. सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब गुंजाळ व ग्रामसेवक राजेंद्र साखरे यांनी नियोजन केले.

या अंतर्गत गावातील १९० जणांना काेरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. आरोग्यसेविका स्मिता गिते, आरोग्यसेविका कमल पाटोळे, आशा सेविका नीता घोरपडे, मदतनीस सीमा डमाळे, आरोग्य साहाय्यक देवेंद्र पालवे, अशोक तेलाेरे, सुरेश ठोंबे, राहुल घोरपडे, शाम लोहकरे, आदींनी मोहीम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

---

कोरोना लसीसंदर्भात ग्रामीण भागातील लोकांच्या मनात भीती आहे. ही भीती, गैरसमज दूर करून आम्ही घरोघर लस देण्याचा तालुक्यातील पहिलाच उपक्रम राबविला.

- रावसाहेब गुंजाळ,

सामाजिक कार्यकर्ते

---

१० वैजूबाभूळगाव

वैजूबाभूळगाव येथे घरोघरी लसीकरणाचे नियोजन करताना आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ.

Web Title: In Vaijubabhulgaon, the disabled and the homeless are vaccinated from house to house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.