वाराणसी-हुबळी एक्सप्रेसची लुट टळली : लुटारू पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 10:02 AM2018-12-15T10:02:48+5:302018-12-15T10:03:06+5:30
वाराणसी - हुबळी एक्सप्रेस शनिवारी रात्री श्रीगोंदा रेल्वे स्टेशनवर थांबली असताना दरोडेखोरांनी लुटीचा प्रयत्न केला. मात्र रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे लुटारूंनी पळ काढला.
श्रीगोंदा : वाराणसी - हुबळी एक्सप्रेस शनिवारी रात्री श्रीगोंदा रेल्वे स्टेशनवर थांबली असताना दरोडेखोरांनी लुटीचा प्रयत्न केला. मात्र रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे लुटारूंनी पळ काढला. रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांनी वेळीच हालचाल केल्याने शस्त्राची बॅग टाळून पसार झाले.
शनिवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा रेल्वे स्टेशनवर चॉपर, एअर पिस्तूल, दोन मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला.
कोपरगाव रेल्वे स्टेशनवर वाराणसी-हुबळी एक्सप्रेस मध्ये ७ ते ८ दरोडेखोरांची टोळी बसली होती. एक्सप्रेस श्रीगोंदा रेल्वे स्टेशनवर थांबली असता दरोडेखोरांनी आरडाओरडा सुरू केली. याचवेळी तिकीट निरीक्षक ए. गडदे, डी. थोरात यांनी रेल्वे मधील सुरक्षा रक्षक दादा येडे, अमोल साळवे, जी. आर. काळे यांच्याशी संपर्क साधला. या जवानांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेत दरोडेखोरांवर रायफली रोखल्या. दरोडेखोर अंधाराचा फायदा घेऊन घेऊन पसार झाले, मात्र त्यांची शस्त्रांची बॅग हाती लागली.
रेल्वे सुरक्षा रक्षकांच्या कामगिरीचे सुरक्षा आयुक्त संजय चौधरी, मंडल सुरक्षा आयुक्त कृपाकर यांनी कौतुक केले.