वारी शिवारात वाळू तस्करांचा प्रांताधिका-यांच्या वाहनावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 01:16 PM2018-02-13T13:16:01+5:302018-02-13T13:16:43+5:30
कोपरगाव तालुक्यातील वारी शिवारात गोदावरी नदी परिसरातून वाळूने भरुन चाललेल्या ढंपरचा पाठलाग करणा-या प्रांताधिका-यांच्या वाहनावर वाळू तस्कारांनी हल्ला केला. या हल्ल्यात प्रांताधिका-यांच्या वाहनाच्या काचा फुटल्या आहेत.
कोपरगाव : तालुक्यातील वारी शिवारात गोदावरी नदी परिसरातून वाळूने भरुन चाललेल्या ढंपरचा पाठलाग करणा-या प्रांताधिका-यांच्या वाहनावर वाळू तस्कारांनी हल्ला केला. या हल्ल्यात प्रांताधिका-यांच्या वाहनाच्या काचा फुटल्या आहेत.
मंगळवारी सकाळी सहा वाजता ही वारी शिवारातून वाळूची चोरटी वाहतूक केली जात होती. याची माहिती महसूल विभागाला मिळताच प्रांताधिका-यांचे एक पथक वारी परिसरात दाखल झाले. त्यावेळी त्यांच्या समोरुन एक वाळूने भरलेला ढंपर जात होता. या ढंपरचा कर्मचा-यांनी पाठलाग सुरु केला. त्यामुळे चिडलेल्या वाळू तस्करांनी प्रांताधिका-यांचे वाहन अडवून या वाहनावर हल्ला केला. दगडाने वाहनाच्या काचा फोडून कर्मचा-यांना मारहाण करण्यात आली. यात महसूल विभागाचे कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यानंतर वाळू तस्करांनी ढंपर घेऊन पळ काढला. कर्मचा-यांनी या घटनेची माहिती वरिष्ठांना दिली. त्यानंतर कर्मचा-यांनी कोपरगाव पोलीस ठाणे गाठले असून, अद्याप फिर्याद दाखल करण्यात आली नाही.