‘वशाट’,‘भैरू’ लघुपट सर्वोकृष्ट : माहितीपटामध्ये ‘फड’ ची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 05:43 PM2019-02-19T17:43:46+5:302019-02-19T17:43:56+5:30
न्यू आर्ट्स, कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेजमधील संज्ञापन अभ्यास विभागाच्या वतीने आयोजित १२ व्या ‘प्रतिबिंब- राष्ट्रीय चित्रपट, लघुपट व माहितीपट महोत्सवामध्ये खुल्या गटात पुणे येथील योगेश गाडगे दिग्दर्शित ‘वशाट’ व तर विद्यार्थी गटामध्ये
अहमदनगर : न्यू आर्ट्स, कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेजमधील संज्ञापन अभ्यास विभागाच्या वतीने आयोजित १२ व्या ‘प्रतिबिंब- राष्ट्रीय चित्रपट, लघुपट व माहितीपट महोत्सवामध्ये खुल्या गटात पुणे येथील योगेश गाडगे दिग्दर्शित ‘वशाट’ व तर विद्यार्थी गटामध्ये सिंधुदुर्ग येथील मानसी देवधर दिग्दर्शित ‘भैरू’ लघुपटाने बाजी मारली. माहितीपट गटामध्ये धुळे येथील धनंजय खैरनार यांच्या ‘फड’ ने प्रथम क्रमांक मिळविला. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अमोल देशमुख आणि सुप्रसिद्ध छायाचित्रकार सचिन सोनावणे यांनी परीक्षण केले.
महोत्सवाचा समारोप आणि पारितोषिक वितरणाचा सोहळा १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी महाविद्यालयाच्या राजर्षी शाहू महाराज सभागृहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र दरे होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. ए. के. पंदरकर, कला शाखेचे उपप्राचार्य प्रा. आर. जे. कोल्हे, संज्ञापन विभागाचे प्रमुख डॉ. बापू चंदनशिवे, महोत्सव संयोजक प्रा. अभिजीत गजभिये आदी उपस्थित होते.
कार्यक्रम पार पडण्यासाठी संज्ञापन विभागाचे प्रा. संदिप गिरे, प्रा. अनंत काळे, प्रा. श्वेता बंगाल यांनी परिश्रम घेतले.
खुला गट- लघुपट
प्रथम - वशाट- (दिग्दर्शक- योगेश गाडगे), पुणे
द्वितीय - पाम्पलेट (दिग्दर्शक- विक्रांत रणखांबे), मुबई
तृतीय- द ड्रेनेज- (दिग्दर्शक- विक्रांत बडारखे), पुणे
उत्कृष्ट दिग्दर्शन- वशाट- (दिग्दर्शक- योगेश गाडगे) पुणे
उत्कृष्ट छायाचित्रण - प्रोंस (दिग्दर्शक - अमित गाडीगोकर), मुंबई
उत्कृष्ट संकलन - लूजर- (दिग्दर्शक - अनुजा रामन), केरळ
विद्यार्थी गट - लघुपट
प्रथम- भैरू, (दिग्दर्शक- मानसी देवधर), सिंधुदुर्ग
द्वितीय - ताजमहाल, (दिग्दर्शक - प्रवीण खाडे), अहमदनगर
तृतीय - मांजा- (दिग्दर्शक- पांडुरंग भांडवलकर), अहमदनगर
उत्कृष्ट दिग्दर्शन - भैरु- (दिग्दर्शक- मानसी देवधर), सिंधुदुर्ग
उत्कृष्ट छायाचित्रण - भैरू- (दिग्दर्शक- मानसी देवधर), सिंधुदुर्ग
निकाल माहितीपट
उत्कृष्ट माहितीपट - फड - (दिग्दर्शक- धनंजय खैरनार), धुळे