मोहंमदिया एज्युकेशन संस्थेत वसुंधरा अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:39 AM2021-03-04T04:39:48+5:302021-03-04T04:39:48+5:30
याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अब्दुस सलाम शेख अजीज जनाब, मुख्याध्यापिका सय्यद फरहाना, मुजफ्फर हुसेन, सय्यद नौशाद अहेमद, फिरिदा ...
याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अब्दुस सलाम शेख अजीज जनाब, मुख्याध्यापिका सय्यद फरहाना, मुजफ्फर हुसेन, सय्यद नौशाद अहेमद, फिरिदा बाजी, इनायतुल्ला शेख, तलमीज सर, बहार अंजूम आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना सलाम म्हणाले, सध्या सर्वत्र पर्यावरणाचा ऱ्हास होताना दिसत आहे. त्यामुळे वातावरणात बदल होऊन ऋतूही बदलत चालले आहेत. निसर्गचक्र अबाधित ठेवण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करून संवर्धन करणे गरजेचे आहे. यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. त्यात आपणही सहभाग घेतला पाहिजे. प्रदूषण ही चिंतेची बाब असून, प्लास्टिकही त्यातील सर्वांत मोठी अडथळा आहे. प्रदूषित हवेमुळे अनेक आजारांना आपणास सामोरे जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन केले पाहिजे. शाळा परिसरात जास्तीत जास्त झाडे लावून त्यांच्या संवर्धनासाठी सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले.
मुख्याध्यापिका सय्यद फरहाना यांनी पर्यावरणाचे महत्त्व सांगितले. प्रा. यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाची शपथ दिली. सूत्रसंचालन इनायतुल्ला शेख यांनी केले, तर आभार बहार अंजूम यांनी मानले.
फोटो ०३ अभियान
ओळी- मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत आयोजित वसुंधरा अभियानात पर्यावरण संरक्षणाची शपथ घेताना शिक्षक व विद्यार्थी.