विडी कामगारांचे नेते शंकर न्यायपेल्ली यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 01:08 PM2020-07-22T13:08:09+5:302020-07-22T13:09:03+5:30
ज्येष्ठ कामगार नेते, विडी कामगारांचे नेते, आयटकचे नेते कॉम्रेड शंकर न्यायपेल्ली (वय ६५) यांचे बुधवारी (२२ जुलै) सकाळी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.
अहमदनगर- ज्येष्ठ कामगार नेते, विडी कामगारांचे नेते, आयटकचे नेते कॉम्रेड शंकर न्यायपेल्ली (वय ६५) यांचे बुधवारी (२२ जुलै) सकाळी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.
कॉम्रेड न्यालपेल्ली यांनी गेल्या ३०- ४० वर्षांपासून विडी कामगारांच्या उद्धारासाठी आपले जीवन वेचले. विडी कामगारांचा रोजगार, त्यांचे घरकुलाचे प्रश्न आदी प्रश्नांसाठी त्यांनी अविरतपणे संघर्ष केला.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून त्यांनी लोकांच्या प्रश्नावर आवाज उठविला. एक शांत, संयमी परंतु लोकांच्या प्रश्नावर आक्रमक असे व्यक्तीमत्त्व होते.
आठ दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आंदोलनातही ते सहभागी झाले होते. मात्र अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचे बुधवारी सकाळी निधन झाले.