सरकारने दिलेल्या जमिनीसाठी वीरपत्नीचा ४६ वर्षांपासून लढा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 05:17 AM2018-08-16T05:17:20+5:302018-08-16T05:17:35+5:30

भारत-पाकिस्तान युद्धात पती शहीद झालेल्या वीरपत्नीला सरकारने दिलेल्या जमिनीचा ४६ वर्षांनंतरही ताबा मिळालेला नसल्याचा संतापदायक प्रकार उघड झाला आहे.

Veerapati has fought for 46 years for the land given by the government. | सरकारने दिलेल्या जमिनीसाठी वीरपत्नीचा ४६ वर्षांपासून लढा!

सरकारने दिलेल्या जमिनीसाठी वीरपत्नीचा ४६ वर्षांपासून लढा!

- हेमंत आवारी
अकोले (जि. अहमदनगर) - भारत-पाकिस्तान युद्धात पती शहीद झालेल्या वीरपत्नीला सरकारने दिलेल्या जमिनीचा ४६ वर्षांनंतरही ताबा मिळालेला नसल्याचा संतापदायक प्रकार उघड झाला आहे. दिल्लीपर्यंत खेटा मारल्या. पण, त्याचा फायदा झाला नाही, अशी खंत मालुंजकर कुटुंबीयांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
कोंडाजी लक्ष्मण मालुंजकर २ आॅक्टोबर १९६५ला शहीद झाले. त्यानंतर १९७२ला औरंगपूर गावात ग्रामपंचायत कार्यालयासमोर वीरचक्र देऊन लष्कराच्या वतीने कुटुंबीयांचा सुवर्णपदक देऊन सन्मान करण्यात आला. औरंगपूर शिवारातील
सर्व्हेनंबर ३६/१मधील दहा एकर म्हणजे ४ हेक्टर जमीन लहानबाई यांना सरकारने दिली. जमिनीचा सात बारा/आठ ‘अ’ उतारा लहानबाई कोंडाजी मालुंजकर यांच्या नावे आहे. पण ४६ वर्षांत शेत जमिनीचा ताबा त्यांना मिळालेला नाही. वनविभागाची ही जमीन सरकारने शहीद मालुंजकर कुटुंबाला दिली आहे. मात्र ही जमीन देण्यास गावकऱ्यांचा विरोध आहे, तसा ठराव ग्रामसभेने केल्याचे गावकरी सांगतात.

कागदपत्रांची पूर्ण तपासणी करून हा प्रलंबित प्रश्न मार्गी लावू. सजगतेने हा प्रश्न हाताळून वेळ पडल्यास या कुटुंबास सरकारकडून संरक्षण देऊन जमिनीची मोजणी करून ताबा देऊ.
- मुकेश कांबळे, तहसीलदार, अकोले.

शहीद कोंडाजी मालुंजकर यांचा प्रश्न मला समजला असून याबाबत पूर्ण माहिती घेऊन तहसील प्रशासनाशी बोलून व गावकºयांशी संवाद साधून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू. कोंडाजी मालुंजकर यांच्याविषयी माझ्यासह सर्व तालुक्याला अभिमान असून शहीद जवानाच्या कुटुंबास न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू.
- वैभव पिचड, आमदार, अकोले.

Web Title: Veerapati has fought for 46 years for the land given by the government.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.